मुंबई : सौंदर्याच्या बाबतीत काही अभिनेत्री या खऱ्या अर्थानं शब्दांच्याही पलीकडल्या असतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक नावं तुमच्याही नजरेत येतील. आरस्पानी सौंदर्याची नेमकी व्याख्या काय, असं विचारलं असता समोर येणारं एक नाव म्हणजे, ऐश्वर्या राय बच्चन.
ऐश्वर्याच्या सौंदर्याच्या बाबतीत किंवा ती जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येते त्यावेळी कधीही कशातही कमीजास्त पणा झालेला नसतो. पण, एक प्रसंग मात्र याला अपवाद ठरली.
2012 मध्ये रितेश देशमुख आणि जिनीलिया यांच्या विवाहसोहळ्याच्या वेळचा हा क्षण. इथं ऐश्वर्या तिचे सासू- सासरे, अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत पोहोचली होती.
गरोदरपणानंतर ऐश्वर्या या क्षणी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली होती. यावेळी तिचा लूक सर्वांचं लक्ष वेधून गेला.
स्टारस्टडेट पार्टीसाठी तिनं यावेळी डिझायनर मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेल्या कलेक्शनमधील अनारकली सूटला पसंती दिली होती.
ऐश्वर्या गरोदरपणानंतरच्या या दिवसांमध्ये प्रथमत: ओळखता आली नाही. पण, वाढलेलं वजनही तिच्या सौंदर्याची लकाकी कमी करु शकली नव्हती.
फ्लोरलेंथ कुर्ता, दुपट्टा आणि साजेसा मेकअप अशी सांगड तिनं यावेळी घातली होती.
सिल्क, नेट, वेल्वेट अशा प्रकारच्या कापडांचा वापर ऐश्वर्याच्या या आऊटफिटसाठी करण्यात आला होता.
नव्यानंच आई झालेल्या महिलेला कोणत्याही प्रकारे टोचणार नाही, डाचणार नाही अशाच पद्धतीनं हा ड्रेस तयार करण्यात आला होता. हा ड्रेस असा होता की यामध्ये बेबी बेली लपवण्यासाठी तिला वेगळं काही करण्याची गरज नव्हती.