मुंबई : एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त बॉलिवूडचे तीन खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षितच्या सिनेमांची चर्चा असायची. तेव्हाच्या काळी बिग बजेटमध्ये साकारण्यात आलेला सिनेमा म्हणजे 'देवदास'. आजही या सिनेमाचे डायलॉग प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. पण जेव्हा 'देवदास' सिनेमाची शुटिंग सुरू होती, तेव्हा दिग्दर्शकासह सिनेमाच्या कलाकारांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. त्याला कारणही तितकचं मोठं आहे.
सिनेमाची शुटिंग सुरू झाली आणि निर्मात्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हा बिग बजेट सिनेमा रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार की डब्बाबंद? असा प्रश्न सिनेमाच्या टीमला उपस्थित होऊ लागला. निर्माते भरत शाह सिनेमात पैसे गुंतवत होते. दरम्यान अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणी भरत शहाला अटक करण्यात आली होती.
भरत शहा हे मोठे निर्माते होते. एकत्र अनेक सिनेमांच्या निर्मिती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तेव्हा भरत यांनी 11 सिनेमांमध्ये पैसे गुंतवले होते. त्यामधील एक म्हणजे सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा स्टारर 'चोरी चोरी चुपके चुपके'.
पण भरत शहा यांच्या पेटीत एका नाझिम रिझवीचे नाव लिहिले होते. नाजिम हा छोटा शकीलचा खास माणूस होता. त्यानंतर नझीमला पकडण्यात आले. भरतच्या प्रॉडक्शनमध्ये बनत असलेल्या सिनेमांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवला जात असल्याची माहिती नाझीमकडून पोलिसांना मिळाली.
तेव्हा भरत यांच्या प्रोडक्शन अंतर्गत 'देवदास' सिनेमाची निर्मिती सुरू होती. 'देवदास'च्या शूटिंगचा रोजचा खर्च 7 लाख रुपये होता. भरतच्या अटकेनंतर 'देवदास'चे शूटिंग रद्द करण्यात आले. सिनेमा डब्बाबंद होणार अशी भीती भन्साळींना सतावत होती. पण भरत सिनेमा प्रदर्शित करायचा या निर्णयावर ठाम होते.
भरत यांनी कोर्टात आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करत 'देवदास' सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली. या प्रकरणातून स्वतःची सुटका करण्यासाठी 'देवदास'च्या बजेटइतका पैसा देशातील प्रसिद्ध वकिलांवर खर्च केला होता.
त्यानंतर अखरे सिनेमा साकारण्यात आला आणि रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. 'देवदास' हा त्या काळातील सर्वात महागडा सिनेमा होता. ते बनवण्यासाठी 50 कोटींहून अधिक खर्च आला.