भारतात परतलेल्या प्रियंकापेक्षा तिच्या बॉडीगार्डची सर्वत्र चर्चा; चेहरा हुबेहूब या सुपरस्टारसारखा

प्रियंकासोबत सावली सारख्या फिरणाऱ्या एका व्यक्तीचीही सोशल मीडियावर चर्चा आहे

Updated: Nov 5, 2022, 05:07 PM IST
भारतात परतलेल्या प्रियंकापेक्षा तिच्या बॉडीगार्डची सर्वत्र चर्चा; चेहरा हुबेहूब या सुपरस्टारसारखा  title=

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (priyanka chopra) नुकतीच भारतात (India) परतली आहे. भारतात परताच सोशल मीडियावर (Social Media) प्रियंकाने आपला दबदबा निर्माण केला आहे. प्रियांका चोप्रा (priyanka chopra) तब्बल 3 वर्षांनी आपल्या देशात परतली आहे. प्रियांका परत आल्यापासून तिचे चाहते तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. भारतात परतल्यानंतर प्रियांका तिच्या वेगळ्या लूकने आणि स्टायलिश स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रियंका एका कार्यक्रमादरम्यान ऑरेंज रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. मात्र प्रियंकासोबत सावली सारख्या फिरणाऱ्या एका व्यक्तीचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.

प्रियांकासोबतच तिच्या बॉडीगार्डबद्दलही (bodyguard) सोशल मीडियावर अचानक चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रियांकाच्या या परदेशातील बॉडीगार्डची सध्या सर्वत्र आहे. नुकतीच प्रियंका मुंबईतील ताजमध्ये (Taj) दिसली होती त्यामुळे तीन वर्षांनंतर ती भारतात आल्याने संपूर्ण मीडियाने (Media) तिला कव्हर करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी प्रियंकाच्या बॉडीगार्डने (bodyguard) माध्यमांना तिच्यापासून दूर केले. यावेळी त्याची स्टाईल, लूक, अॅटिट्यूड सर्व कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रियंकाच्या बॉडीगार्डच्या सर्वत्र चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, प्रियंका चोप्राच्या परदेशी बॉडीगार्ड ठेवण्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला, तर बहुतेकांना तो हॉलीवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्ससारखा वाटत आहे.  रेनॉल्ड्सने 'डेडपूल' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. प्रियांका चोप्रा आता बहुतांशी परदेशात काम करत आहे आणि तिचे लक्ष हॉलिवूडच्या प्रोजेक्ट्सवर आहे.