पोस्टरमध्ये दिसणारी 'ही' व्यक्ती अर्चना पूरन सिंह नसून आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता

सिल्व्हर बॉडीकॉन ड्रेस, डोळ्यात काजल, मोठे केस, रक्ताने माखलेले हात... हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे.

Updated: Aug 23, 2022, 07:22 PM IST
पोस्टरमध्ये दिसणारी 'ही' व्यक्ती अर्चना पूरन सिंह नसून आहे बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता  title=

मुंबई : सिल्व्हर बॉडीकॉन ड्रेस, डोळ्यात काजल, मोठे केस, रक्ताने माखलेले हात... हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. बॉलीवूडच्या आगामी क्राईम थ्रिलर चित्रपटाचं हे पोस्टर आहे. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. पण या पोस्टरमध्ये दिसणारा चेहरा तुम्हाला ओळखता येतोय का? आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री नसून इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. ज्याची घोषणा 'हड्डी' चित्रपटाच्या मोशन पोस्टरसोबत जाहीर करण्यात आली आहे.

नवाजुद्दीन दिसणार स्त्रीच्या भूमिकेत?
हे पोस्टर पाहून असं वाटतं की, ती या चित्रपटात एका महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. तीही अतिशय धोकादायक महिलेच्या भूमिकेत. पोस्टर शेअर करत नवाजुद्दीन या चित्रपटात कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्याचं शूटिंग सुरू झालं असून पुढील वर्षी 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे मोशन पोस्टर पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, हा सिनेमा सस्पेन्स, मिस्ट्री आणि क्राइम थ्रिलर असणार आहे. ज्यामध्ये नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याची कधीही न पाहिलेली शैली पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विशेष बाब म्हणजे पोस्टरमध्ये नवाजुद्दीन जेव्हा मेकअप करुन मुलीच्या रुपात दिसला तेव्हा प्रथमदर्शनी लोकांनी त्याला अर्चना पूरण सिंह समजलं. ज्याबद्दल त्यांनी कमेंट करून सांगितलं आहे की. नवाजुद्दीनचा हा लूक  अभिनेत्री अर्चना पूरण सिंगसारखा दिसत आहे. तसं, हड्डी व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या टिकू वेड्स शेरूमुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो त्याच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या अवनीत कौरसोबत दिसणार आहे.