close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Miss India 2019 : 'ही' सौंदर्यवती ठरली यंदाची 'मिस इंडिया'

या यशाचा आनंदही तिने व्यक्त केला

Updated: Jun 16, 2019, 10:25 AM IST
 Miss India 2019 : 'ही' सौंदर्यवती ठरली यंदाची 'मिस इंडिया'
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेचा किताब सुमन राव हिने पटकावला आहे. शनिवारी इंदुर येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिममध्ये विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत या सोंदर्यस्पर्धेची अंतिम फेर पार पडली. त्यावेळी तिचा गौरव करण्यात आला. 

यंदाच्या मिस इंडिया २०१९ स्पर्धेत छत्तीसगडच्या शिवानी जाधव हिला clinched Femina Miss Grand India 2019 आणि बिहारच्या श्रेया शेखर हिला Miss India United Continents 2019 या किताबांनी गौरवण्यात आलं. 

मिस इंडियाचा किताब पटकावणारी २० वर्षीय सुमन ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून, थायलंड येथे पार पडणाऱ्या 'मिस वर्ल्ड़' स्पर्धेत ती भारताचं प्रतिनिधीत्वं करणार आहे. वयाच्या या टप्प्यावर मिळालेल्या या यशाचा आनंदही तिने व्यक्त केला. 

'ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जिद्द आणि पूर्ण समर्पकतेने प्रयत्न करता तेव्हा तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी ही त्या लक्ष्याच्याच दिशेने काम करण्यास सुरुवात करते. त्या यशाच्या वाटेवर वाटचाल करण्यास सुरुवात  करते', असं ती म्हणाली. 

शनिवारी पार पडलेल्या मिस इंडिय़ा सौंदर्यस्पर्धेत परीक्षकपदी बॉलिवूडमधील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा, अभिनेत्री हुमा कुरेशी, चित्रांगदा सिंग, फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन पिकॉका आणि भारतीय फटहॉलपटू सुनील छेत्री यांची उपस्थिती होती. 

अतिशय दिमाखदार अशा या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी कतरिना कैफ, विकी कौशल, मौनी रॉय यांच्या परफॉर्मन्सने आणखी रंगत आणल्याचं पाहायला मिळालं. चित्रपट निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि अभनेता मनिष पॉल यांनी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.