‘पद्मावती’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन, अभिनेता शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर नुकताच या सिनेमातील दीपिका लूक रिलीज करण्यात आला.

Updated: Sep 25, 2017, 12:38 PM IST
‘पद्मावती’ मधील शाहिदचा फर्स्ट लूक रिलीज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन, अभिनेता शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर नुकताच या सिनेमातील दीपिका लूक रिलीज करण्यात आला.

दीपिकाच्या लूकचं कौतुकही करण्यात आलं. त्यानंतर प्रेक्षकांना चाहुल लागली ती या सिनेमात अभिनेत्यांच्या लूक्सची. आता नुकताच शाहिदचा या सिनेमातील लूक रिलीज करण्यात आलाय. 

संजय लीला भन्साली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात शाहिद कपूर महारावल रतन सिंह यांची भूमिका साकारत आहे. तर रणवीर सिंह हा अलाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसेल. शाहिदचा या सिनेमातील लूक फारच आक्रामक दिसत आहे. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये तो युद्धाच्या मैदानात रक्ताने माखलेला दिसतो आहे. 

दरम्यान, हा सिनेमा सुरूवातीपासून वेगवेगळ्या कारणांनी वादात राहिला आहे. राजस्थानच्या राजपूत करणी सेनेने या सिनेमाचं पोस्टर जाळून या सिनेमाला विरोध दर्शवला होता. आता हा सिनेमा १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे तेव्हा काय परिस्थीती असेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.