'Bigg Boss' मधील स्पर्धकाला न्यूड योगाची ऑफर, मागितले 50 लाख

पुढे विवेक म्हणाला की, मला बिग बॉसच्या 5 जुन्या स्पर्धकांना परत आणायचे आहे, ज्यामुळे कार्यक्रम एका इंटरेस्टींग वळणार येईल.

Updated: Aug 1, 2021, 07:33 PM IST
 'Bigg Boss' मधील स्पर्धकाला न्यूड योगाची ऑफर, मागितले 50 लाख title=

मुंबई : टेलिव्हिजनवरील बिग बॉस संबंधी मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत कडक असताना, डिजिटल प्लॅटफॉर्मवर मात्र नियमांमध्ये बरीच शिथिलता आहे. अशा परिस्थितीत, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी विवेक मिश्रासोबत संपर्क साधून या शोमध्ये न्यूड योगा प्रॅक्टीसच्या आधारे कार्यक्रम मसालेदार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

बिग बॉस OTT मध्ये न्यूड योगा?

बिग बॉस OTTच्या निर्मात्यांना याबाबत विवेक मिश्राकडून प्रतिक्रिया देखील आली आहे. तो म्हणाला की मला शोच्या ओटीटी आवृत्तीसाठी ऑफर मिळाली होती आणि निर्मात्यांनी मला न्यूड आणि सेमिन्यूड योगाभ्यासाद्वारे कार्यक्रम मसालेदार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. 

पुढे विवेक म्हणाला की, मला बिग बॉसच्या 5 जुन्या स्पर्धकांना परत आणायचे आहे, ज्यामुळे कार्यक्रम एका इंटरेस्टींग वळणार येईल. 

एका एपिसोडसाठी 50 लाख 

विवेक म्हणाला की, मी आधीही बिग बॉसमध्ये गेलो आहे. पण पुन्हा फक्त न्यूड योगाचा सराव करण्यासाठी मोठ्या रिआलिटी शोमध्ये जाणं योग्य नाही. मला ते करणं खूप महागात पडू शकतं.  शोमध्ये एन्ट्री केल्यानंतर एका एपिसोडसाठी मला 50 लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी विवेकने केली होती.