युजर्सकडून अभिनेत्रीच्या मुलांना शाप देण्याचा प्रकार, काय आहे नेमकं प्रकरण? 

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन तिच्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. 

Updated: Aug 1, 2021, 07:04 PM IST
युजर्सकडून अभिनेत्रीच्या मुलांना शाप देण्याचा प्रकार, काय आहे नेमकं प्रकरण? 

मुंबई : लिसा हेडन बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र जेव्हापासून तिचं लग्न झालंय तेव्हापासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. लिसा अलीकडेच तिसऱ्या मुलाची आई झाली आहे आणि ती तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. लिसाने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

लिसा ट्रोल झाली
बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन तिच्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. यासोबतच तिला अनेक वेळा ट्रोलिंगला बळी व्हावं लागतं. लिसा तिच्या गर्भधारणेबद्दल खूप ट्रोल झाली होती. काही युजर्सने सांगितलं की, मॅडमला कदाचित गर्भवती असणं आवडतं. ज्याचे उत्तर लिसाने खूप चांगल्याप्रकारे दिलं आहे. आता सोशल मीडियावर काही ट्रोलर्सनी लिसाच्या मुलांबद्दल आक्षेपार्ह कमेंन्ट केल्या आहेत. आणि तिला खूप ट्रोलही केलं आहे. यावर, लिसाने देखील योग्य उत्तर दिलं आणि ट्रोलरर्सची बोलती बंद केली.

लिसाच्या मुलांवर कमेंन्ट
अलीकडेच लिसा हेडनने सोशल मीडियावर फेस क्रीमची अॅड करणारा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी सांगितलं की, ती हे उत्पादन नक्कीच वापरतील. तर काहींनी लिसा आणि तिच्या मुलांना ट्रोल करायला सुरुवात केली. एका युजर्सने कमेंटमध्ये लिहिलं, 'लिसा हेडन, लोकांचं आयुष्य उध्वस्त करू नको, अशा क्रिमची विक्री थांबवा अन्यथा तुमचे चाहते तुमच्या मुलांना शाप देतील.' युजर्सच्या या कमेंटवर लिसाने आपला प्रतिसाद दिला आहे.

लिसाला दिलं योग्य उत्तर 
लिसा हेडननेही विलंब न करता युजर्सच्या कमेंन्टवर तिचं उत्तर दिलं आहे. लिसाने फक्त एका शब्दात 'वाह' अशी कमेन्ट दिली आहे. या युजरला काहीही चांगलं किंवा वाईट न म्हणता लिसाचा हा एक शब्द वापरकर्त्याचं बोलणे थांबवण्यासाठी पुरेसा आहे. लिसा हेडनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती, 'आयशा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याशिवाय ती 'हाऊसफुल 3', 'द शौकीन्स', रास्कल्स, 'क्वीन', 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटांमध्ये दिसली आहे.