'एबीसीडी 3' च्या शूटिंगसाठी वरुण धवन वाघा बॉर्डरवर

वरुनने देशभक्त‍ी गीतांवर  दमदार नृत्य सादर केले. 'कंधों से मिलते हैं कंधे... ' या गाण्यावर नृत्य केले.

Updated: Jan 26, 2019, 07:25 PM IST
'एबीसीडी 3' च्या शूटिंगसाठी वरुण धवन वाघा बॉर्डरवर

मुंबई:प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून अभिनेता वरुण धवन वाघा बॉर्डर येथे पोहचला. तिकडे त्याने भारतीय जवानांसोबत बीटिंग रिट्रीट मध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर त्याने देशभक्त‍ी गीतांवर नृत्य सादर केले. वरुण धवनचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'एबीसीडी 3 ' लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात वाघा बॉर्डर येथे होणाऱ्या बीटिंग रिट्रीट चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वरुन अमृतसर (पंजाब) येथे 22 जानेवरी पासून सिनेमाचे शूटिंग करत आहे. या सिमेनात पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा आणि दिलजीत दोसांज हे खास अतिथी म्हणून झळकणार आहेत.

वरुनने देशभक्त‍ी गीतांवर  दमदार नृत्य सादर केले. 'कंधों से मिलते हैं कंधे... ' या गाण्यावर नृत्य केले. वाघा बॉर्डरवर रोज  बीटिंग रिट्रीट होते, पण 26 जानेवरीचा नजारा फार खास असतो. त्यामुळे 26 जानेवरीला वाघा बॉर्डर येथे शूटिंग करण्याचा निर्णय 'एबीसीडी 3 'सिनेमाच्या टिमने घेतला.

2018 साली आलेल्या 'अक्टूबर' अणि 'सुई धागा' या दोन सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. सध्या वरुण धवनचा कलंक सिनेमा चर्चेत आहे. सिनेमात आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि कुणाल खेमू झळकणार आहे. 19 एप्रिल 2019  रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.