अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण देशमुख कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पहा Video

रितेश देशमुख याने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Updated: Sep 7, 2024, 07:40 PM IST
अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणरायाचं आगमन, संपूर्ण देशमुख कुटुंबाने केली मनोभावे पूजा, पहा Video
( Photo Credit : Social Media )

Riteish Deshmukh House Ganpati 2024 : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणरायाचं आगमन होतं आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीजच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलिवूड आणि मराठी सिनेश्रुष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. रितेश देशमुख याने सोशल मीडियावर घरच्या बाप्पा सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले असून यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

रितेशच्या मुलांचा मराठमोळा लूक : 

रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने सोशल मीडियावर घरच्या आरतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात संपूर्ण देशमुख कुटुंब गणरायाच्या भक्तीत लिन झालेले दिसत असून घरातील चिमुकल्या मुलांनी गणपतीची पहिली आरती केली. यावेळी देशमुख कुटुंबातील मुलांचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. रितेश देशमुखची मुलं रियान आणि राहील तसेच भाऊ अमित आणि धीरज यांच्या मुलांनी देखील पारंपरिक टोपी परिधान केली होती. 

ritesh deshmukh

गणेशाची पारंपरिक सजावट : 

देशमुख कुटुंबियांच्या घरी गणपतीसाठी अत्यंत साधी पारंपरिक सजावट केलेली पाहायला मिळते. त्यांचा गणपती हा देवाच्या खोलीत बसवलेला दिसत असून देवाला नैवेद्य म्हणून वेगवेगळे व्यंजन दाखवण्यात आले आहेत. जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रितेश जिनिलिया त्यांची मुलं या व्यतिरिक्त आमदार माजी मंत्री अमित देशमुख, पत्नी अदिती तसेच धाकटे भाऊ आमदार धीरज देशमुख आणि पत्नी दीपशिखा सुद्धा दिसत आहेत. 

जिनिलियाचा पैठणी लूक : 

ritesh deshmukh

गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केलेत. यात जिनिलियाने पैठणीचा घागरा परिधान केला असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फॅन्स फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. 

About the Author