'ते स्वत:च्या मनानं वागायचे, 20 वर्षांपासून...'; वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच गश्मीरनं केलं वक्तव्य

Gashmeer Mahajani on relationship with Father Ravindra Mahajani : गश्मीर महाजनी यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि वडील रविंद्र यांच्यात कसे संबंध होते याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 25, 2023, 04:22 PM IST
'ते स्वत:च्या मनानं वागायचे, 20 वर्षांपासून...'; वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच गश्मीरनं केलं वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Gashmeer Mahajani on relationship with Father Ravindra Mahajani : गेल्या महिन्यात दिग्गज अभिनेता रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. पण त्यांच्या निधनाच्या दोन ते तीन दिवसांनंतर त्यांच्याच घरी त्याचा मृतदेह सापडला. यासगळ्यानंतर महाजनी कुटुंबातील अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांना पडला होता तो म्हणजे रवींद्र हे त्यांच्या कुटुंबासोबत का राहत नव्हते? त्यावरून त्यांचा मुलगा गश्मीरला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अखेर आता गश्मीरनं स्पष्टीकरण दिलं आहे. 

गश्मीरनं नुकतीच ‘इ-टाइम्स’ला मुलाखत दिली. प्रत्येक व्यक्तीच्या दोन बाजू असतात. प्रत्येकाला आपण परफेक्ट असावं अशी इच्छा असते. पण तसं कधी होत नाही. त्याच प्रकारे मी पण परफेक्ट नाही आणि माझे वडील ते देखील परफेक्ट नव्हते. कुटुंब म्हणून आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही आणि त्यांनी गेल्या 20 वर्षांपासून वेगळे राहणं पसंत केलं होतं. त्यांचं असं एकटं राहणं आम्ही कुटुंब म्हणून स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी एक कुटुंबाला स्वीकारावं अशी आम्ही त्यांच्यावर कधी जबरदस्ती केली नाही. ते अत्यंत मूडी होते. जेव्हा त्यांना आमच्यासोबत रहायची इच्छा व्हायची तेव्हा ते भेटायला यायचे. त्यांना दुसरं कोणी त्यांचं काम करतं हे आवडायचं नाही. इतकंच नाही तर स्वतःचं जेवणही ते स्वतः बनवायचे. कोणत्याही घरकाम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी दोन दिवसापेक्षा जास्त काळ राहू दिलं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रवींद्र यांच्या निधनाविषयी कोणतीही माहिती नसण्यावर प्रश्न विचारताच गश्मीर म्हणाला, यावर मी काहीही स्पष्टीकरण देणार नाही आहे. कारण मी जे बोलेन त्याचा वेगळा अर्थ काढण्यात येईल. पण, वडिलांच्या तो कधीच जास्त क्लोज नव्हता असं त्यानं म्हटलं. ते माझ्या आईचे पती आणि माझे वडील होते... तर दुसरीकडे आमच्यात दुरावा निर्माण झाला होता आणि ते सर्वांसमोर यायला नको होतं. 

हेही वाचा : 'या' व्यक्तीमुळं वयाच्या 47 व्या वर्षीही अविवाहित अमिषा पटेल...

पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील एका फ्लॅटमध्ये रवींद्र राहत होते. 15 जुलै रोजी तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरात तीन दिवस मृतावस्थेत पडून होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. 

गश्मीर विषयी बोलायचे झाले तर तो एक उत्तम दर्जेचा अभिनेता आहे. अभिनेता असण्यासोबत गश्मीर हा एक उत्तम डान्सर देखील आहे. गश्मीर महाजनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 381K फॉलोवर्स आहेत.