गौहर खानला पतीकडून धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पण सुखी संसार सुरु असताना गौहरने आता पतीने तिला लग्नाआधी धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: Jul 31, 2021, 07:54 PM IST
गौहर खानला पतीकडून धमकी, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई: अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार बॉलिवूडमधील चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसतात. या जोडीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहगाठ बांधली. आणि अलीकडेच हे जोडपे लग्नाच्या 6 महिन्यांनंतर हनीमूनला गेले होते. 

पण सुखी संसार सुरु असताना गौहरने आता पतीने तिला लग्नाआधी धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, जैदने तिच्यासमोर लग्नासाठी एक अट ठेवली होती. जे गौहरला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची होती.

जैदची लग्नासाठी एक अट

अलीकडेच, एका मुलाखतीत अभिनेत्री गौहर खानने तिच्या आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले. लग्नानंतरचा एक किस्सा शेअर करताना तिने सांगितले की, जैदने मला सांगितलं की, मी तुझ्यासाठी, तुझ्या कामाचे  सगळं शुटींगच वेळापत्रक सांभाळेण, पण जर तु लग्नात तु मेहंदी काढता आली नाही, तर हे लग्न होणार नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

जैदच्या अटीमागचं कारण

खरंतर, जैदला मेहंदी खूप आवडते आणि मी लग्नात माझ्या हातावर छान मेहंदी नक्की काढावी अशी त्याची इच्छा होती.

लग्नानंतर माझं शूटिंग होतं 

गौहरने पुढे सांगितले की, मला मेहंदी काढता येणार नव्हती, कारण लग्नानंतर काही दिवसांनी मला माझ्या 14 फेरे चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईला जायचं होते. सोबतच पतीचं कौतुक करत गौहर म्हणाली, जैद खूप सपोर्टिव्ह नवरा आहे, लग्नानंतर तो माझ्यासोबत चित्रपटाच्या शूटिंगसाठीही आला होता.