राज कुद्रावरुन गहना वशिष्ठ आणि शर्लिन चोप्रा वाद टोकाला

 गेहना वसिष्ठने  शर्लिन चोप्राला फटकारलं आहे.

Updated: Sep 28, 2021, 04:56 PM IST
राज कुद्रावरुन गहना वशिष्ठ आणि शर्लिन चोप्रा वाद टोकाला title=

मुंबई : 'गंदी बात' वेब सीरिज फेम अभिनेत्री गेहना वसिष्ठने अलीकडेच बोल्ड सीनने भरलेल्या प्ले बॉय मग्जिन कव्हर गर्ल असलेल्या शर्लिन चोप्राला फटकारलं आहे. 'कामसूत्र' सिनेमाची मुख्य अभिनेत्री असलेल्या शर्लिन चोप्राबद्दल, गहाना वसिष्ठ म्हणाली की, तिने राज कुंद्राची पूजा केली पाहिजे कारण आज ती जी काही आहे ती त्याच्यामुळेच आहे. एका मुलाखतीमध्ये बरेच खुलासे केले आहेत.

गहना वशिष्ठ शर्लिनबद्दल मोकळेपणाने बोलली
दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गहना वशिष्ठ म्हणाली, 'तिला दुसरं काही करायचं नाही आणि केवळ चर्चत राहण्यासाठी ती हे सगळं करत आहे. शर्लिन चोप्रा हिनेही हाच स्टंट करत आहे. जेणेकरून तिच्यावर बोल्ड कंटेंट बनवण्याचा आरोप लागणार नाही. मात्र आता ती शिल्पा शेट्टी कुंद्रासोबत पर्सनव होवू लागली आहे. जे तिच्याच विधानांवर लक्ष देत नाही. शिल्पा शर्लिनच्या वक्तव्याला तिच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यासही योग्य मानत नाही.

शर्लिनने राज कुंद्राची पूजा करावी
शर्लिन चोप्राने राज यांच्यामुळे खूप पैसा कमावला आहे आणि तिने त्यांचे आभार मानले पाहिजेत. असेही गहाना वसिष्ठने म्हटलं आहे. शर्लिन चोप्रा हिने तिची पूजा केली पाहिजे कारण आज ती जी काही आहे ती तिच्यामुळेच आहे. असंही ती म्हणाली. 

याशिवाय, गहाना वसिष्ठने असंही म्हटलं की, शर्लिन चोप्रा हिने बोल्ड कंटेंट बनवण्यासाठी राजला जबरदस्तीने यांत ओढलं आहे. गहाना वसिष्ठने दावा केला की, शर्लिन चोप्रा राज कुंद्राला केवळ अडीच वर्षांपूर्वी भेटली होती. मात्र ती 2012पासून बोल्ड आणि अश्लील कंटेट बनवत आहे.