लग्नात रितेशने आठवेळा धरले पाय... Genelia D'Souza कडून मोठा खुलासा

लग्नात रितेशवर का आली पत्नी जेनेलियाचे पाय धरण्याची वेळ? 

Updated: Aug 1, 2021, 08:08 AM IST
लग्नात रितेशने आठवेळा धरले पाय... Genelia D'Souza कडून मोठा खुलासा

मुंबई : डान्स रियालिटी शो 'सुपर डान्सर 4' सतत  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शोमध्ये  अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या खांद्यावर परीक्षकाची जबाबदारी आहे. पण सध्या ती शोपासून दूर आहे. त्यामुळे शोमध्ये वेग-वेगळे पाहुणे त्यांची उपस्थिती दर्शवत आहेत. 'सुपर डान्सर 4' शोच्या आगामी भागात अभिनेत्री जेनेलिया डिसूजा (Genelia D'Souza) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसणार आहेत.  सध्या शोचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये जेनेलियाने तिच्या लग्नातील एक किस्सा सांगितला आहे. शोची थिम 'वेडिंग स्पेशल' असल्यामुळे जेनेलियाला तिच्या लग्नातील एक किस्सा लगेच आठवला. जेनेलिया म्हणाली, 'लग्नात रितेशने माझे आठवेळा पाय धरले होते.' यावर रितेश म्हणाला, 'पंडीतजींना ठावूक होत लग्नानंतर मला काय करायचं आहे. त्यांमुळे तेव्हा त्यांनी माझी प्रॅक्टिस करून घेतली.'

पुढे रितेश म्हणाला, 'महाराष्ट्राची संस्कृती आहे, ज्याअंतर्गत नवरदेवाला नवरीच्या पाया पडावं लागतं.' सध्या जेनेलिया आणि रितेशचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.