झायरा, सोफियानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने इस्लाम धर्मासाठी सोडलं फिल्मी जग

छोटे आणि रिविलिंग कपडे घालणार नाही, अचानक असं का म्हणाली ही प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ही अॅक्टरेस? 

Updated: Aug 23, 2022, 04:32 PM IST
झायरा, सोफियानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने इस्लाम धर्मासाठी सोडलं फिल्मी जग title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत ज्यांनी इस्लाम धर्मासाठी फिल्मी जगाला रामराम ठोकला आहे. या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दंगल फेम झायरा वासिम आणि मॉडेल, अभिनेत्री सोफिया हयात यांचे नाव आघाडीवर आहे. या लिस्टमध्ये आता आणखीण एक नाव जोडले जाणार आहे. कारण या प्रसिद्ध अभिनेत्रीसुद्धा आता इस्लाम धर्मासाठी फिल्मी जग सोडलं आहे. त्यामुळे फिल्मी जग सोडणारी ही अभिनेत्री कोण आहे ते जाणून घेऊय़ात. 

बॉलिवूडमध्ये झायरा वासिम आणि सोफिया हयातने इस्लाम धर्मासाठी बॉलिवूड सोडलं होत. या अभिनेत्रीनंतर आता घानाच्या रोसामुंड ऑलरेड ब्राउन या अभिनेत्रीने अभिनय सोडून इस्लाम धर्म स्विकारला आहे. इस्लाम स्विकारल्यानंतर रोसामुंडने लहान आणि रिविलिंग कपडे घालणार नसल्याची मोठी घोषणा केली. यासह संपुर्ण शरीर झाकूनसुद्धा ती ग्लॅमरस दिसेल असं वक्तव्य देखील तिने केला आहे.  

अभिनेत्री रोसामुंड ब्राउन सोशल मीडियावर अकुआपेम पोलू या नावाने प्रसिद्ध आहे. या अकुआपेमने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही छायाचित्रे शेअर करून इस्लाम धर्म स्वीकारल्याची पुष्टी केली. या फोटोंमध्ये ती लांब गाऊन आणि हिजाबमध्ये दिसत आहे. तसेच अकुआपेमने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तिने इस्लाम धर्म स्वीकारण्याचे कारण स्पष्ट केले आहे. 

अभिनेत्री रोसामुंड म्हणते, माझा मुलगा नऊ वर्षांचा असून तो मुस्लिम आहे. मी एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केले असल्याचे ती म्हणतेय. मी काय करत आहे हे मला माहीत आहे. मी अनेक वर्षांपासून इस्लाम धर्म माहितीय आणि माझे बरेच मित्र मुस्लिम आहेत, त्यामुळे मला मुस्लिम आणि इस्लाम आवडतो असे ती म्हणते.  

अभिनेत्री रोसामुंड पुढे म्हणते की, मी सर्व काही फक्त अल्लाहसाठी करतेय. मला ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये काही फरक दिसत नाही. कारण प्रत्येकजण अल्लाहला प्रार्थना करतो, असेही ती म्हणतेय. दरम्यान या अभिनेत्रींच्या घोषणेनंतर अनेकांना आश्चर्य वाटले आहे.