'स्वैग से स्वागत' या गाण्यावरील भन्नाट डान्स व्हिडिओ...

 बॉलीवू़डचा दबंग खान सलमान खानचा 'टाइगर जिंदा है' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापुर्वी या चित्रपटाचे 'स्वैग से स्वागत' हे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 9, 2017, 01:12 PM IST
'स्वैग से स्वागत' या गाण्यावरील भन्नाट डान्स व्हिडिओ... title=

नवी दिल्ली : बॉलीवू़डचा दबंग खान सलमान खानचा 'टाइगर जिंदा है' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापुर्वी या चित्रपटाचे 'स्वैग से स्वागत' हे गाणे लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

 क्रेझ वाढत आहे

या गाण्यातील सलमान आणि कॅटरिनाने जबरदस्त डान्स केला आहे. याची भलतीच क्रेझ युवा पिढीत दिसून येतेय. या गाण्यावर डान्स करून अनेकांनी आपले व्हिडिओज सोशल मीडीयावर शेअर केले आहेत. आणि या व्हिडिओजना लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. असाच एक व्हिडिओ dancemaniahyd नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला. या व्हिडिओत एका मुला-मुलीने मस्त डान्स केला. हा व्हिडिओ गेल्या महिन्यात २७ तारखेला अपलोड करण्यात आला होता. तो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.आतापर्यंत या व्हिडिओला १८९,६१८ वेळा पाहीला गेला आहे. त्याबरोबर खूप कमेंट्स मिळाल्या आहेत. 

जवळपास ५ वर्षानंतर सलमान-कटरिना चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.