Girlfriend File Cheating Case Against Actor: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनबरोबरच ना सामी रांगासारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता राज तरुण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चात आहे. राजच्या लिव्ह इन पार्टनरने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीमुळे तो चर्चेत आला आहे. राजची प्रेयसी लावण्याने त्याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. राजचे दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर प्रेमसंबंध असल्याचं लावण्याने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणाशी संबंधित अनेकांनी दिलेल्या माहितीनुसार, लावण्या नावाच्या या तरुणीने नरसिंघी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राज तरुणने आपल्याला खोटी आश्वासन दिली आणि आपला विश्वासघात केला असं लावण्याने म्हटलं आहे. '123 तेलगु' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, राज तरुण आणि लावण्या हे दोघे 2012 पासून रिलेशनमध्ये होते. हे दोघे 2014 पासून एकत्र राहत होते. लावण्याने आता राजचे मुंबईतील एका अभिनेत्रीबरोबर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा आरोप केला आहे. बऱ्याच काळापासून हे प्रेमसंबंध सुरु असून त्यामुळे आमच्या नात्यात कटूता निर्माण झाली असं लावण्याने म्हटलं आहे.
लावण्याने केलेल्या आरोपानुसार राज तरुण हा त्यांच्या राहत्या घरी मागील तीन महिन्यांपासून परतलेला नाही. तसेच राज तरुणशीसंबंधित अन्य एका व्यक्तीने आपल्याला धमकावल्याचा आरोपही लावण्याने केला आहे. आपण हे नातं संपवण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याला राज तरुणशीसंबंधित व्यक्तीकडून धमकावलं जात असल्याचा आरोप केला आहे.
नक्की पाहा हे फोटो >> 'घाणेरडी पॉ* मानसिकता, तू नरकात मरशील'; अश्लील कमेंट करणाऱ्याला रितेशच्या अभिनेत्रीनं सुनावलं
लावण्याने केलेल्या आरोपानंतर राज तरुणने आपलं स्पष्टीकरण जारी केलं आहे. 'तेलगू 360'ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज तरुणने, "लावण्याला अमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं. मला तिच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाऊ लागलं. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने मी यासंदर्भात पोलिसांकडे गेलो नाही. ती मस्तान साईला डेट करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मी तिला एवढे पैसे पुरवले पण तिने माझा विश्वासघात केला," असा आरोप केला आहे.
नक्की वाचा >> 'त्यांच्या आया-बहिणींना...'; कृतिका मलिकसमोर विशाल-लव्हकेशचा घाणेरडा संवाद! Video समोर
"2017 नंतर ती अमली पदार्थाच्या आहारी गेली. मला तिच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाऊ लागलं. ती मला ब्लॅकमेल करु लागली. तिने मला माझाच फ्लॅट रिकामा करायला सांगितला. याआधी लावण्या अमलीपदार्थ प्रकरणामध्ये तुरुंगातही गेली आहे. मी या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करणार असून मला विश्वास आहे की प्रसारमाध्यमं माझ्या पाठिशी उभी राहतील," असा विश्वास राज तरुणीने व्यक्त केला आहे.