मुंबई : सध्या देशात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. कोरोना व्हायरसच्या या युद्धामध्ये प्रमुख योगदान असणारे योद्धा म्हणजे पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार यांना सन्मान देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. त्याचा हा ४७वा वाढदिवस होता. परंतु त्याला त्याच्या वाढदिवासानिमित्त अत्यंत चांगली भेट मिळाली आहे. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत गॉड ऑफ क्रिकेट' (God of cricket) या आगामी चित्रपाटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरला निर्माता महेश भट्टने आवाज दिला आहे.
चित्रपटाचा मोशन पोस्टर अनेक उभरत्या कलाकारांना प्रेरणा देणारा आहे. "जब गॉड ने कहा खेलना है तो बस खेलना है." असं वाक्य म्हणताना एका लहान क्रिकेटरमधील खेळा प्रती असलेलं प्रेम आणि आवड व्यक्त होताणा दिसत आहे. खुद्द महेश भट्ट यांनी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे.
Twitter - A true Hero knows that if may be stormy now but it never rains forever …#GodOfCricket coming soon @sachin_rt#YellowstoneStudios #ShiningSunStudios #ChandJannatFilms @RDMMedia pic.twitter.com/qO8tqQhaWb
— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) April 24, 2020
हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'एका खरा हिरोच समजू शकतो की सध्या वादळ आहे, पण पाऊस कायम राहत नाही.' गॉड ऑफ क्रिकेट' चित्रपटाचं पहिलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या चित्रपटात कुस्तीपटू संग्राम सिंग मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.