अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओमार्फत प्राजक्ताने एक मोठी घोषणा केली आहे.  

Updated: Feb 6, 2024, 06:10 PM IST
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा title=

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जिचा फॅनक्लब खूप मोठा आहे. तिच्या चाहत्यांना कायमच तिच्या पर्सनल आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी फार आवडतं.  प्राजक्ताने कायमच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्राजक्ता कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असते. प्राजक्ताने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच काही क्षणातच ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असणाऱ्या प्राजक्ताने नुकताच इन्स्टग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमार्फत प्राजक्ताने एक मोठी घोषणा केली आहे. जे ऐकून तिच्या चाहत्यांना कमालीचा आनंद होताना दिसत आहे. सध्या प्राजक्ता आणि हास्यजत्राची संपुर्ण टीम सिंगापूरमध्ये आहे. ही संपुर्ण टीम शुटिंगनिमीत्त सिंगापूरमध्ये आहे. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हास्यजत्राचे कलाकार शेअर करत आहेत. मात्र प्राजक्ताने सिंगापूरमधल्या युनव्हर्सल स्टुडिओमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेला हा व्हिडीओ प्राजक्ताच्या दागिन्यांचा ब्रँण्ड प्राजक्तराजचा प्रमोशनल व्हिडीओ आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला प्राजक्ता माळी म्हणतेय की, 'नमस्कार मंडळी आणि आज आपण एक नवीन दागिना लॉन्च करणार आहोत. प्राजक्तराज पारंपारिक साजमध्ये आणि आज मला फार आनंद होतोय ती हा दागिना मी सिंगापूरमधून लॉन्च करतेय. आज आम्ही आलोय युनिव्हर्सल स्टुडिओला आणि बाकी सगळी टीम गेलीये राइड्सला, आपला लॉन्च होता म्हणून मी खाली थांबलीये. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आणि स्वागत आहे प्राजक्तराज पारंपारिक साजमध्ये.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'आज ओळखा पाहू कोणता दागिना आहे तो. अशी म्हणायची मी वेळच तुमच्यावर येवू देणार नाहीये. कारण मी परिधान केलेलेा आहे दागिना. आणि तुम्ही म्हणाल हे आम्ही पाहिलंय म्हाळसामधील हा दागिना आहे. याच नाव कोणाला येतंय का? कोणी ओळखू शकत का? माहितीये खरंतर हे सगळ्यांना. आहे हा दागिना आधीपासूनच. जाऊद्या मी फार तुमची परिक्षा बघत नाही. आपल्याकडे याला आपण या दागिन्याला मराठी ऑथेंण्टिक नाव देवूया वज्रटिक. ही वज्रटीक आहे. आपल्याकडे वज्रटिकआधीच आहे. आज आपण लॉन्च करतोय 'मोकळ्या घश्याची वज्रटिक.' प्राजक्ताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हीडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.