Guess Who:भावाच्या कुशीत हसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र तिचा दबदबा!

आज ही चिमुरडी भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री  (actress)  आणि मॉडेल (model) आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गजांसोबत काम केलं आहे.

Updated: Sep 21, 2022, 09:28 AM IST
Guess Who:भावाच्या कुशीत हसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र तिचा दबदबा! title=
Guess Who childhood photo of beautiful Bollywood actress nm

Guess Who: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चॅलेंज सुरु आहे, ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांना त्यांचे बालपणीचे फोटो पोस्ट करून ओळखावे लागते. तर दुसरीकडे ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai) Miss World झाली तेव्हा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) कसा दिसायचा हा फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.  लोकांना बॉलिवूडमधील स्टार लहानपणी कसे दिसायचे किंवा अभिनेत्री असो अभिनेता यांचे जुने फोटो पाहिला खूप आवडतात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो (childhood photo) आणला आहे. आम्हाला खात्री आहे शंभर टक्के लोकांना तो ओळखता येणार नाही. (Guess Who childhood photo of beautiful Bollywood actress nm)

पहचान कौन?

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी तिच्या भावाच्या मांडीवर हसताना दिसतं आहे. आज ही चिमुरडी भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री (actress) आणि मॉडेल (model) आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गजांसोबत काम केलं आहे. आपण ओळखलं का? तर आम्ही तुम्हाला आणखी काही हिन देतो. सुंदर आणि मोहक हास्याने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी स्वतःची एक प्रोडक्शन कंपनी (Production Company) सुरू केली आहे. ही अभिनेत्री सर्वात तरुण चित्रपट निर्माती देखील आहे. एवढंच नाही तर प्रसिद्ध क्रिकेटरसोबत तिचं खास नातं आहे. आता तरी तुम्हाला कळलं का कोण आहे ही गोंडस मुलगी? 

तर ही आहे...

फोटोत तिच्या भावासोबत दिसणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आहे. अनुष्काने 2008 मध्ये आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) रोमँटिक ड्रामा फिल्म 'रब ने बना दी जोडी'(Rab Ne Bana Di Jodi ) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुख्य भूमिका होती. या चित्रपटात त्याने उत्कृष्ट अभिनय केला. अनुष्कानेही तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. तर प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) Better half आहे.