'गली बॉय'च दुसरं गाणं रिलीज

.2 मिनिटांच हे गाणं अत्यंत प्रेरणा देणारं आहे.

Updated: Jan 14, 2019, 05:25 PM IST
'गली बॉय'च दुसरं गाणं रिलीज title=

मुंबई:अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट 'गली बॉय'च दुसरं गाणं रिलीज झालय.'आपना टाइम आएगा' अशी वाक्यरचना असलेलं हे गाणं स्वतः रणवीर सिंगने गायलं आहे.2 मिनिटांच हे गाणं अत्यंत प्रेरणा देणारं आहे. सिनेमात फटकळ स्वभावाच्या मुलीची भूमिका आलिया भटने साकारली आहे. मुस्लिम मुलीची भूमिका आलिया भट बजावत आहे.तिच्या आशा स्वभावाचं आणि कामाचं सर्वत्र कौतूक होत आहे. रणवीर सिंग प्रत्येक सिनेमात आपली भूमिका चोख पार पाडतो. कोणतेही पात्र तो त्याच्या अभिनयातून जिवंत करतो.'गली बॉय'मध्ये चाहत्यांना अनेक गोष्टी एकत्र अनुभवायला मिळणार आहेत. ज्यामध्ये रॅप, हिप-हॉप संगीत आहे. मुंबईच्या झुग्गी-झोपडीमध्ये राहणाऱ्या दोन लोकांची ही गोष्ट आहे. जे त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर देशातील मोठे रॅपर बनतात.रणवीर सिंगची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

 

 

सिनेमाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले असून निर्माती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंग आणि आलिया भट झळकणार  आहेत. कलकी कोचलिन सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.14 फेब्रुवारीला 'गली बॉय' प्रदर्शित होणार आहे. आता रणवीरच्या सिंबा नंतर 'गली बॉय' चाहत्यांच्या पसंतीस खरा ठरणार की नाही पाहणे मजेशीर असणार आहे.