रणवीर सिंहच्या मनात कधी दीपिकाला गमावण्याची भीती होती?

काय म्हणाला रणवीर 

 रणवीर सिंहच्या मनात कधी दीपिकाला गमावण्याची भीती होती?  title=

मुंबई : रणवीर सिंहचा आगामी सिनेमा 'गली बॉय'ची सध्या खूप चर्चा आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी रणवीर पत्नी दीपिकाबद्दल अगदी भरभरून बोलत आहे. एका मुलाखती दरम्यान त्याला विचारण्यात आलं की, तुला कधी दीपिकाला गमावण्याची भीती होती का?  

फिल्मफेअरच्या फेमस्ली फिल्मफेअर या शोमध्ये रणवीर सिंहला विचारलं की, 'तो गेल्या 6 वर्षांपासून दीपिकाला डेट करत आहे'. लग्नाच्या अगोदर या दोघांनी या गोष्टीचा कधीच खुलासा केला नाही? 'तर या 6 वर्षात तुला कधी दीपिकाला गमावण्याची भीती वाटली का?'

यावर रणवीर सिंहने उत्तर दिलं की, 'नाही, मला असा विचार आणि ही भीती कधीच वाटली नाही. आमच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. पण मी निश्चय केला होता की, मी दीपिकाची साथ कधीच सोडणार नाही. मी दीपिकासाठी काहीही करायला तयार होतो.'

जगातील सर्वात चांगला नवरा होणार याच मुलाखतीत रणवीर सिंहने सांगितलं की, 'तो जगातील सर्वात चांगला नवरा होणार आहे.' या अगोदर दीपिका देखील फेमसली फिल्मफेअर शोमध्ये आली आहे. तेव्हा दीपिकाला विचारण्यात आलं की, 'तू लग्नानंतर नाव बदलणार आहेस का?' तेव्हा दीपिकाने उत्तर दिलं की,'माझं नाव दीपिका पदुकोण वाइफ ऑफ रणवीर सिंह पदुकोण असं आहे.'