हॉरर लूकमधल्या या बॉलीवूड कपलला तुम्ही ओळखलत का?

हॅलोविनच्या निमित्ताने सगळे स्टार्स आपापल्या स्टाइलमध्ये पार्टी सेलिब्रेट करत आहेत. 

Updated: Oct 31, 2021, 03:38 PM IST
हॉरर लूकमधल्या या बॉलीवूड कपलला तुम्ही ओळखलत का?  title=

मुंबई : हॅलोविनच्या निमित्ताने सगळे स्टार्स आपापल्या स्टाइलमध्ये पार्टी सेलिब्रेट करत आहेत. अलीकडेच एका बॉलीवूड कपलचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये त्याला पहिल्या नजरेत ओळखणं कठीण होत आहे.

31 ऑक्टोबर हॅलोविन आज जगभरात साजरा केला जात आहे. पश्चिम देशांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अमेरिका, इंग्लंड आणि युरोपीय देशांमध्ये हॅलोविन साजरा केला जातो. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा उत्सव साजरा केला जातो. या प्रसंगी लोकं असे कपडे घालतात आणि मेकअप करतात जेणेकरून ते भितीदायक दिसतात. (Happy Halloween) ला  Hallows Eve, All Saints Eve, All Hallow Evening, All halloween असंही म्हणतात. त्याचबरोबर एखादा सण असला की, आपलं बॉलीवूड तरी कसं मागे राहिल. बॉलिवूडचे सेलेब्सही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत.

सोहा आणि कुणालचा वेगळा अवतार
हॅलोविनच्या या खास प्रसंगी बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आणि मुलांसोबत सेलिब्रेशन केलं. त्याची एक पार्टी होती ज्यामध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर देखील दिसला होता. या पार्टीत प्रत्येकजण हॅलोविन अवतारात दिसले होते. कुणी पांढरे कपडे घालून आलं , तर कुणी चेहऱ्याला भितीदायक मेकअप दिला. सर्वांनी हे फेस्टिवल मोठ्या थाटामाटात साजरा केला. या पार्टीचे काही फोटो सोहा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोहा अली खानने शेअर केलेल्या या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'घाबरा अजून घाबरा, हॅलोवीन 2021' लिहीलं आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आणि इतर सेलिब्रिटींना खूप पसंती मिळत आहे. कमेंट करत सबा पतौडीने लिहिलं आहे की ''मनमोहक, कदाचित भितीदायक..जेव्हा भरपूर प्रेम असतं', तर तिच्या एका चाहत्याने 'सोहा, तू खूप सुंदर दिसतेस' असंही लिहिलं आहे.