धडक गर्ल जान्हवीचे 22व्या वर्षात पदार्पण

आई श्रीदेंवीच्या अचानक निघून जाण्याने न डगमगता तिने आपला प्रवास सुरूच ठेवला.

Updated: Mar 6, 2019, 11:06 AM IST
धडक गर्ल जान्हवीचे 22व्या वर्षात पदार्पण

मुंबई : बॉलिवूडची धडक गर्ल अभिनेत्री जान्हवी कपूरने आज 22 व्या वर्षात पदार्पण केले. आई श्रीदेंवीच्या अचानक निघून जाण्याने न डगमगता तिने आपला प्रवास सुरूच ठेवला. 'सैराट' सिनेमाचा रिमेक असलेल्या 'धडक' सिनेमाच्या माध्यमातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. करण जोहर दिग्दर्शित धडक सिनेमाने चाहत्यांवर चांगलीच जादू केली. सिनेमातील झिंगाट गण्याने तरूणांना वेड लावून ठेवले होते. जान्हवीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जान्हवीच्या  वाढदिवसच्या दिवशी व्हायरल झालेल्या या फोटो मध्ये सोनम कपूरच्या मांडीवर जान्हवी खेळताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Aww soo cute babbyy JanhviKapoor with #SonamKAhuja Such a lovely wish Thanks sonamkapoor

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Princess JanhviKapoor

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Princess JanhviKapoor

 

 गतवर्षी जान्हवीने तिच्या आईच्या निधनानंतर एका वृद्ध आश्रमात वाढदिवस साजरा केला होता.

 इंडियन एयरफोर्सच्या वैमानिक गुंजन सक्सेना यांची यशोगाथा जाह्नवी कपूर प्रेक्षकांपुढे मांडणार आहे. या सिनेमासाठी जान्हवी कपूर विशेष मेहनत घेत आहे. सिनेमाच्या शूटिंगचे काम अंतीम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे श्रीदेवींवर चित्रित करण्यात आलेल्या 'मॉम' सिनेमात रिवा अरोरा त्यांच्या लहान मुलीच्या भूमिकेत झळकली होती. आता श्रीदेवींची रील लाईफ मुलगी आणि रिअल लाईफ मुलगी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यानंतर ती दिग्दर्शक करण जोहरच्या मल्टीस्टारर 'तख्त' सिनेमात झळकणार आहे.