'मिर्जापुर' मधल्या डिम्पीने कॅमरासमोर ओलांडल्या सगळ्या मर्यादा; शेअर केले बोल्ड फोटो

देशातील प्रसिद्ध वेब सीरिजपैकी एक 'मिर्झापूर' लोकांना खूप आवडते.

Updated: Oct 19, 2022, 03:58 PM IST
'मिर्जापुर' मधल्या डिम्पीने कॅमरासमोर ओलांडल्या सगळ्या मर्यादा; शेअर केले बोल्ड फोटो title=

मुंबई : देशातील प्रसिद्ध वेब सीरिजपैकी एक 'मिर्झापूर' लोकांना खूप आवडते. या वेब सीरिजचे लोकं इतके वेडे आहेत की, तिसऱ्या सीझनचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना या सिरीजमधील प्रत्येक कलाकार खूप आवडतो आणि त्यातील एक म्हणजे हर्षिता गौर. हर्षिताने 'मिर्झापूर'मध्ये डिंपीची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमध्ये साधी दिसणारी डिंपी खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे आणि हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कळतंच.

हर्षिताचे बोल्ड फोटो
अभिनेत्री हर्षिता गौरने 'मिर्झापूर' या सुपरहिट वेब सीरिजमध्ये डिम्पी पंडितची भूमिका साकारली आहे. मिर्झापूरमध्ये हर्षिताचा अभिनय पाहून चाहते तिच्या अभिनयावर फिदा झाले होते. केवळ अभिनयच नाही तर तिच्या लूकमुळे ही अभिनेत्री जवळपास रोजच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हर्षिताचा नवा लूक व्हायरल होत आहे.

हर्षिता इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या पर्सनल लाईफ, फोटोशूट आणि वर्कफ्रंटची झलक चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या नवीन फोटोशूटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती सोफा खुर्चीवर बसलेली दिसत आहे. हर्षिताने येथे जाळीदार स्लीव्हलेस डीप नेक वन पीस ड्रेस कॅरी केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या लूकला पूर्ण करण्यासाठी हर्षिताने न्यूड मेकअप केला आहे याचबरोबर तिने या लूकसह आपले केस मोकळे ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.  युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजी शेअर केले आहेत.  हर्षिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'मिर्झापूर 3' मध्ये दिसणार आहे. या मालिकेच्या पुढील भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेच्या मागील दोन्ही भागांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती.