खुल्लमखुल्ला 'या' मिस्ट्री गर्लसोबत फिरतोय अनिल कपूर यांचा मुलगा

अनिल कपूर यांच्या मुलासोबत ही मिस्ट्री गर्ल कोण? जिच्या हातात हात घालून फिरतोय हर्षवर्धन कपूर  

Updated: Mar 28, 2022, 01:20 PM IST
खुल्लमखुल्ला 'या' मिस्ट्री गर्लसोबत फिरतोय अनिल कपूर यांचा मुलगा  title=

मुंबई : अभिनेते अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर झगमगत्या विश्वापासून दूर असतो. पण आता हर्षवर्धन अचानक चर्चेत आला आहे. हर्षवर्धनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कपूर कुटुंबाचा मुलगा एका मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हर्षवर्धला तुझ्यासोबत असलेली ती मुलगी कोण आहे? असा प्रश्न विचारत आहेत. हर्षवर्धन जिच्या हातात हात घालून फिरतोय ती कोण आहे? हे अद्याप कळू शकलेलं नाही. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हर्षवर्धन आणि ती मुलगी एकत्र रस्त्यावर फरताना दिसत आहे. हर्षवर्धनसोबत असलेली मिस्ट्री गर्ल प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. एवढंच नाही तर ती धुम्रपान करताना देखील दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हर्षवर्धनला युजर्स विचारत आहेत की, 'ती तुझी गर्लफ्रेंड तर नाही ना?' तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, 'ती स्मोकिंग करत आहे....'

हर्षवर्धनचं करियर
बॉलिवूडमध्ये अनिल कपूर यांच्या मुलाने एन्ट्री तर केली, पण तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला.  2015 साली त्याने 'बॉम्बे वेलवेट' सिनेमातून सहाय्याक दिग्दर्शक म्हणून काम केलं. 

त्यानंतर 'मिर्जया' सिनेमातून त्याने अभिनयास सुरूवात केली. 'मिर्जया' सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री सैयामी खेरने मुख्य भूमिका साकारली. पण 'मिर्जया' सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला