काजोलने मुलीकरता खर्च केले करोडो रुपये.... का घेतला एवढा मोठा निर्णय

का घेतला निर्णय 

काजोलने मुलीकरता खर्च केले करोडो रुपये.... का घेतला एवढा मोठा निर्णय  title=

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी परदेशात पाठवतात. तेथील शाळा, कॉलेजमध्ये कलाकारांची मुलं शिक्षण घेतात. जसं शाहरूख खानने आपल्या मुलीला सुहाना खानला लंडनमध्ये शिक्षणाकरता पाठवलं आहे. आता तिच्या पाठोपाठ आणखी एक स्टार किड परदेशात आपलं शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. 

अशी माहिती मिळतेय की काजोल आणि अजय देवगनने आपल्या मुलीला न्यासाला शिकण्यासाठी सिंगापुरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिथे न्यासाला राहण्यासाठी एक अपार्टमेंट देखील खरेदी केला आहे. 

15 वर्षांची न्यासा सिंगापुरच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ ईस्ट एशियामध्ये आपलं पुढचं शिक्षण घेणार आहे. अजयने हे अपार्टमेंट अगदी न्यासाच्या कॉलेजजवळच घेतलं आहे. हे घर सिंगापुरच्या ऑर्चर्ड रोडवर असून अपार्टमेंट अतिशय सुंदर आहे.  

काजोलने आपल्या मुलीसाठी सिंगापुर निवडलं कारण ते मुंबईपासून अगदी जवळ आहे. तसेच सिंगापुरला जाण्यासाठी फ्लाइट अगदी सहज मिळावी याकरता हे निवडलं. 2019 मध्ये न्यासा आपल्या नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. 

असं म्हटलं जातं की, न्यासा अतिशय शांत आणि कमी बोलणारी मुलगी आहे. न्यासाचं कॉलेज बोर्डिंगची व्यवस्था करत होते पण तिथे तिला घरा सारखं वातावरण नसतं मिळालं. म्हणून अजयने सिंगापुरला घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x