Video Viral : Family Function मध्ये समोर आली सलमानची डान्स पार्टनर, पाहुणेही पाहतच राहिले

अभिनेता सलमान खानला आज कोण ओळखत नाही. सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सलमान त्याच्या चाहत्यांचं कायमच मनोरंजन करत असतो. त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सलमान नेहमीच सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. 

Updated: Dec 29, 2023, 12:07 PM IST
 Video Viral : Family Function मध्ये समोर आली सलमानची डान्स पार्टनर, पाहुणेही पाहतच राहिले title=

मुंबई : अभिनेता सलमान खानला आज कोण ओळखत नाही. सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सलमान त्याच्या चाहत्यांचं कायमच मनोरंजन करत असतो. त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सलमान नेहमीच सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सलमानने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. आता सलमान खानचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता सलमान खान नुकताच ५८ वर्षांचा झाला आहे.  27 डिसेंबरला त्याने त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. या निमीत्ताने त्याचे चाहते देशातील कानाकोपऱ्यातून त्याच्या घराच्या बाहेर त्याच्या घराबाहेर पोहचले होते. सलमानने आपला हा खास दिवस त्य्चया परिवारासोबत त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सिलिब्रेट केला आहे. त्याच्या वाढदिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहेत. त्याच्या वाढदिवसाचे फोटो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

याचदरम्यान सलमानचा एक क्यूट व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान त्याची आई सलमा खानसोबत थिरकताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये  सलमान आणि त्याची आई  दोघंही गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 'चीप थ्रिल्स' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. डान्सच्या शेवटी सलमान त्याच्या आईला मिठी मारुन किसही  करतो. सलमान आणि त्याच्या आईचं नातं किती स्ट्रॉन्ग आहे हे सर्वानाच माहितीये. सलमान आपल्या आईच्या खूप जवळ आहे. सलमान आपल्या आईसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो.

समोर आलेला व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल
मात्र आ्मी तुम्हाला सांगतो की, अभिनेत्याचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ  2019 चा आहे. या व्हिडीओमध्ये सलमा खआने फ्लोरल प्रिंटेड गाऊन परिधान केला आहे. सलमानचा हा जुना व्हिडीओ  त्याच्या वाढदिवसामुळे पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेता सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सलमान शेवटचा 'टाइगर 3'मध्ये दिसला होता. या सिनेमात अभिनेता कतरिनासोबत रोमान्स करताना दिसला होता. आता वृत्त आहे की, सलमान लवकरच करण जोहरच्या अपकमिंग सिनेमात दिसणार आहे. मात्र अद्याप तरी अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे सत्य आहे की, केवळ एक अफवा आहे हे येणारा काळच ठरवेल.