हे वागणं बरं न्हवं.... 'गाल' प्रकरणावरुन नेतेमंडळींना हेमा मालिनींनी खडसावलं

'सर्वसामान्यांचं ठीक पण तुम्ही...'  

Updated: Dec 20, 2021, 12:30 PM IST
हे वागणं बरं न्हवं.... 'गाल' प्रकरणावरुन नेतेमंडळींना हेमा मालिनींनी खडसावलं title=

मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री आणि वरिष्ठ शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर सडकून टीका होता आहे. यावर आता खुद्द खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काही ववर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी याचं शब्दांचा वापर केला. तेव्हा पासून हा ट्रेन्ड झाला आहे....' असं म्हणत त्यांनी अत्यंत सौम्य शब्दात या प्रकरणाचा विरोध केला. 

काय म्हणाल्या हेमा मालिनी?
'मी माझे गाल सुरक्षित ठेवेन आणि काळजी घेईल... काही ववर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी याचं शब्दांचा वापर केला. तेव्हा पासून हा ट्रेंन्ड झाला आहे. आता प्रत्येक जण अशा शब्दांचा वापर करतात, पण हे योग्य नाही. जर सामान्य व्यक्ती बोलत असतील तर आपण समजू शकतो. 

पुढे हेमा मालिनी म्हणाल्या, 'पण संसदेतील आणि नेते अशा शब्दांचा भाषणात उपयोग करत असतील तर ते अयोग्य आहे. कारण प्रत्येकाने महिलांचा आदर करायला हवा. शिवाय कोणत्याही कारणासाठी महिलांचा उपयोग करणं योग्य नाही... असं देखील त्या यावेळी म्हणाल्या. 

यानंतर तुम्हाला या वक्यव्याबद्दल माफी हवी का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्याा, 'नाही... मी या सर्व गोष्टींची काळजी करत नाही...' सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मंत्र्यांची विवादित टिपणी 
जळगावचे अनेक वर्षे आमदार असलेले भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल करताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, ३० वर्षे आमदार असलेल्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन रस्ते बघावेत. जर हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन. सध्या त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.