मुंबई : बॉलिवूडचे शहंशाह अमित बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं नानावटी रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचं शनिवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील म्हणाले.
कोरोनासोबत इतर आजार असतील तर धोका थोडा अधिक असतो असं वारंवार सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे अगदी वयोवृद्ध असले तरीही कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडे देखील सर्वाधिक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांची अधिक काळजी घेणं महत्वाचं आहे.
कौन बनेगा कोरडपती' (KBC)च्या पहिल्या पर्वाच्या शूटिंगवेळी अमितभा बच्चन यांना टीबी झाला होता. शोच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला टीबी झाला होता. यासाठी आपण जवळपास एक वर्ष उपचार घेत होतो. अमिताभ यांना मणक्यांचा टीबी झाला होता. यामुळे त्यांना फार वेळ बसलं जात नव्हतं.
१९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन यांचा पोटात गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचे बरेच रक्त गेलं.. रक्तदात्यांनी त्यांना रक्त देऊन, त्यांना वाचवलं. पण रक्तातून झालेल्या दुसऱ्या आजाराने त्यांना ग्रासलं. रक्तदात्यांपैकी एकाल हॅपिटायटिस बी हा आजार होता. ते रक्त अमिताभ यांच्या शरीरात गेल्यानं त्यांनाही हा आजार झाला आहे.
७७ वर्षांचे असलेल्या अमिताभ बच्चन यांचे फक्त २५ टक्के लिव्हर सध्या काम करत आहे. हॅपेटायटिसच्या इन्फेक्शनमुळे त्यांचे ७५ टक्के लिव्हर हे निकामी झाले आहे. वर्ष २००० पर्यंत ते ठणठणीत होते. पण एका वैद्यकीय तपासणीत त्यांच्या लिव्हरला इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. यामुळे सध्या त्यांच लिव्हर फक्त २५ टक्के इतकच काम करत आहे.
काही वर्षांपूर्वी अमिताभ यांच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २००५ मध्ये त्यांना पोटात प्रचंड दुखू लागलं होतं. त्यावेळी हा गॅस्ट्रोची समस्या आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला. पण नंतर सखोल तपासणी केल्यावर त्यांच्या आतड्या काही प्रमाणात कमकुवत झाल्याचं समोर आलं. या आजारात मोठे आणि छोटे आतडे कमकुवत होते आणि त्यांना सूज येते. अमिताभ यांना यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यांना दोन महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले.