Holi 2019: का बंद झाल्या बॉलिवूडच्या अनेक होळी पार्ट्या

राज कपूर पासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत, का बंद झाली होळी पार्टी

Updated: Mar 20, 2019, 12:54 PM IST
Holi 2019: का बंद झाल्या बॉलिवूडच्या अनेक होळी पार्ट्या title=

मुंबई : सिनेकलाकार आणि बॉलिवूडची होळी सेलिब्रेशन नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर या स्टारच्या होळी पार्टीची नेहमी चर्चा असते. अनेक कलाकार आपल्या घरी होळीनिमित्त पार्टीचं आयोजन करत होते. पण हळूहळू हे बंद झालं. यामध्ये पृथ्वीराज कपूर यांच्यापासून अमिताभ बच्चन यांच्याकडून आयोजित होणाऱ्या पार्टींचा देखील समावेश आहे.

राज कपूर यांची होळी पार्टी : आरके स्टूडिओमध्ये होणारी होळी नेहमीच चर्चेचा विषय असायची. या पार्टीला अनेक कलाकार उपस्थित राहत होते. सकाळीपासून सुरु होणारी ही पार्टी संध्याकाळीपर्यंत सुरु असायची. राज कपूर हे पार्टी होस्ट करत होते. पण १९८८ मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर ही पार्टी बंद झाली होती.

यश चोपडा यांची होळी पार्टी : प्रसिद्ध सिनेनिर्माते यश चोपडा यांच्या यशराज स्टूडिओमध्ये देखील होळी पार्टीचं आयोजन होत होतं. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार या पार्टीला हजेरी लावत असत. पण त्यांच्या निधनानंतर ही होळी पार्टी बंद झाली.

सुभाष घई यांची होळी पार्टी : निर्माते सुभाष घई यांच्या मड आयलँड येथील बंगल्यावर होळीचं सेलिब्रेशन होत असत. पण आता ही पार्टी बंद झाली आहे. यामध्ये टेक्निशियन्स आणि डिझायनर देखील सहभागी होत होते.

अमिताभ बच्चन यांची होळी पार्टी : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यावर ग्रँड होळी पार्टी होत होती. होळी सेलिब्रेशनसाठी अनेक कलाकार बच्चन कुटुंबियांच्या घरी येत होते. पण २००८ मधील मुंबई हल्ल्यानंतर ही पार्टी बंद झाली.