'मै तुम्हारे बच्चे की माँ...', Ex Wife पाठलाग सोडत नाही, तोच भर कोर्टात अभिनेत्याची आणखी एक भानगड समोर?

प्रत्यक्षात अशा घटना घडल्याचं फार क्वचितच तुमच्या नजरेत किंवा ऐकिवात आलं असेल.   

Updated: May 25, 2022, 11:12 AM IST
'मै तुम्हारे बच्चे की माँ...', Ex Wife पाठलाग सोडत नाही, तोच भर कोर्टात अभिनेत्याची आणखी एक भानगड समोर?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'मै तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ...', असं म्हणत एखादी महिला भर कार्यक्रमात किंवा अचानकच दारावर धडकते आणि मग आपल्याकडे एखाद्या अपराध्याच्या नजरेतून पाहिलं जातं. हे चित्र तुम्ही आम्ही आजवर चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. पण, प्रत्यक्षात अशा घटना घडल्याचं फार क्वचितच तुमच्या नजरेत किंवा ऐकिवात आलं असेल. 

हा असाच प्रसंग नुकताच प्रत्यक्षात घडला आहे. ज्यामुळं आधीच चर्चेक असणारं प्रकरण पुन्हा नव्यानं लक्ष वेधताना दिसत आहे. हे प्रकरण म्हणजे अभिनेता जॉनी डेप आणि त्याची एक्स वाईफ, अभिनेत्री एम्बर हर्ड यांच्यामध्ये असणाऱ्या अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या खटल्याचं. (Johnny Depp Amber Heard case)

वर्जिनियाच्या न्यायालयात याप्रकरणीची सुनावणी सुरु आहे. इथं सुनावणीदरम्यान न्यायालयात आणि न्यायालयाबाहेरसुद्धा जॉनीच्या बऱ्याच चाहत्यांची उपस्थिती पाहायसा मिळते. अशातच नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, एका महिलेला न्यायालयातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. (Hollywood Actor johnny depp fan shouted at court during the case with amber heard )

सोमवारी एम्बर आणि जॉनीच्या प्रकरणात सुनावणीदरम्यान असणाऱ्या विश्रांती काळात एक महिला जोरजोरात, 'जॉनी, आय लव यू... आपला आत्मा एकमेकांशी जोडला गेल आहे' असं एकाएकी ओरडू लागली. 

पुढे तिच्याकडे पाहून जॉनीनं हातानं इशारा केला. तेव्हा लगेचच ओरडत ती महिला म्हणाली, हे तुझं मूल आहे... न्यायालयात त्यावेळी न्यायाधीश उपस्थित नव्हते म्हणून प्रकरण ताणलं नाही. पण, एम्बर हे ऐकून थक्कच झाली. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या या महिलेला सुरक्षा रक्षकांनी लगेचच बाहेर काढलं. 

बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मी तर मस्करी करत होते, असं त्या महिलेनं स्पष्ट केलं. दरम्यान, तिथं चाहते जॉनीला शक्य त्या सर्व मार्गांनी आधार देताना दिसत असतानाच आता एम्बरनं त्याच्यावर केलेला प्रत्येक आरोप फसताना दिसत आहे. 

चुकीचा आणि दिशाभूल करणारा जबाब, गुंतागुंतीची वक्तव्य, खोटे पुरावे या साऱ्यामुळं तिच्याच अडचणी वाढताना दिसत आहेत. मुद्दा असा, की आता या प्रकरणाचा नेमका निकाल कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.