स्टार अभिनेत्रीचा मोठा खुलासा, 'या' चित्रपटानंतर बदललं संपुर्ण आयुष्य

200 पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा खुलासा, कोण आहे ही अभिनेत्री ? 

Updated: Aug 5, 2022, 05:42 PM IST
स्टार अभिनेत्रीचा मोठा खुलासा, 'या' चित्रपटानंतर बदललं संपुर्ण आयुष्य title=

मुंबई : स्टार अभिनेते-अभिनेत्री अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. कधी चित्रपटामुळे तर कधी वैयक्तिक आय़ुष्यातील घटनांमुळे ते चर्चेत असतात. अशीच एक स्टार अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आय़ुष्यातील एका प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ? आणि ही अभिनेत्री कोण आहे ? ते जाणून घेऊय़ात. 

अभिनेत्री जेनिफरने वयाच्या 38 व्या वर्षी अमेरिकन अॅडल्ट कॉमेडी फ्रँचायझी फिल्म 'अमेरिकन पाई' मध्ये भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेत्रीने एका आईची भूमिका साकारली होती. या आईचे तिच्याच मुलाच्या मित्रासोबत शारीरिक संबंध असतात. या चित्रपटाची त्यावेळी खूप चर्चा रंगली होती.

खुलासा काय?
जेनिफरने आता खुलासा केला आहे की, त्या चित्रपटामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक लैंगिक क्रिया झाल्या होत्या. एवढेच नाही तर जेनिफरच्या म्हणण्यानुसार तिने 200 हून अधिक लोकांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे तिने सांगितले आहे. जेनिफरच्या या खुलाशानंतर तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ती पुढे म्हणते की, 
तिच्या आयुष्यात हे सर्व बदल केवळ 'अमेरिकन पाय' चित्रपटामुळे झाले आहेत. 

मुलाखतीत काय म्हणाली?
व्हरायटी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर कूलिजने 200 लोकांसोबत सेक्स केल्याची कबुली दिली आहे. ती म्हणते, 'तो चित्रपट करण्याचे अनेक फायदे झाले. मी 200 पुरूषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा चित्रपट आला नसता, तर मी कदाचितच हे करू शकले नसले. 

'अमेरिकन पाय' 1999 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात जेनिफर कूलिजने स्टिफलरच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. त्याचबरोबर या चित्रपटातील जेनिफरच्या भूमिकेचीही त्यावेळी खूप चर्चा झाली होती.