रिलेशनशिपमध्ये Serious होणं सेलिब्रिटीला पडलं महागात; जिच्यावर प्रेम केलं, तिनंच दिला दगा

काय दिवस पाहावा लागला... 

Updated: Aug 9, 2022, 09:30 AM IST
रिलेशनशिपमध्ये Serious होणं सेलिब्रिटीला पडलं महागात; जिच्यावर प्रेम केलं, तिनंच दिला दगा  title=
Kim Kardashian Pete Davidson break up

मुंबई : काही दिवसांपूर्वीच सेलिब्रिटी विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली. ही बातमी होती एका स्टार जोडीच्या ब्रेकअपची. इंफ्लुएन्सर, मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दशियन आणि पेट डेविडसन यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याची. 

गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या किम आणि पेट यांनी आपल्या वाटा वेगळ्या केल्या. कामातच जास्त गुंतल्यामुळं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवण्यात अडचणी आल्यामुळं हे नातं तुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. 

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीतून मात्र वेगळाच उलगडा झाला. नऊ महिन्यांच्या या नात्यात असणारं प्रेम- जिव्हाळा आता कमी झाला होता. पेट अतिशय चांगला जोडीदार होता, पण ती (किम) मात्र नात्यात सध्या कोणताही serious निर्णय घेण्यासाठी तयार नव्हती, अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. (Kim Kardashian Pete Davidson break up)

किम आणि पेटचं नातं अजूनही कायम आहे, पण तिला सध्या मात्र एकटीला राहायचं असून डेटिंगपुरताच मर्यादित राहायचं आहे. त्यामुळं सध्या तरी त्यांच्यातील मैत्री कायम आहे अशी माहिती त्या दोघांशीही संलग्न सूत्रांनी दिली. 

किम जेव्हापासून पेटसोबतच्या नात्यात होती तेव्हा तिला Ex Husband कान्ये वेस्ट याच्याहून पेट अतिशय वेगळा वाटला. ती यातच फार आनंदी होती. पण, एकत्र राहू लागल्यानंतर त्यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला. पेटसोबतचं हे नातं पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी किम तयार नसल्यामुळं तिनं या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. 

नात्यात serious होणं पेटला एका अर्थी महागातच पडलं, कारण त्याला आपलं प्रेमाचं माणूस गमावावं लागलं. आता किमान त्याच्या प्रेमापोटी तरी किम या Relationship चा पुन्हा विचार करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.