कोरोना वॉरियर्स सोबत रंगणार होम मिनिस्टर घरच्याघरी

कोविड योद्ध्यांसोबत रंगणार पैठणीचा खेळ आणि आदेश भाऊजींच्या गप्पा

शैलेश मुसळे | Updated: Jul 23, 2020, 04:17 PM IST
कोरोना वॉरियर्स सोबत रंगणार होम मिनिस्टर घरच्याघरी title=

मुंबई : होम मिनिस्टर घरच्याघरीच्या येणाऱ्या विशेष भागामध्ये आदेश भावोजी 'कोरोना वॉरियर्स' सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. जे स्वतःचा विचार न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी सतत झटत आहेत. त्यांचा सन्मान आणि त्यांना थोडासा आनंद देण्याचा झी मराठी आणि होम मिनिस्टर हा प्रयत्न आहे. कोरोना काळात घरच्यांपासून दूर राहून हे कोरोना वॉरियर्स जनतेची काळजी घेत होते. 

होम मिनिस्टर घरच्याघरीच्या खास भागांमधून प्रेक्षकांसमोर हे सर्व कोरोना वॉरियर्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. होम मिनिस्टर घरच्याघरी चे हे विशेष भाग २७ जुलै पासून संध्याकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांना पाहयला मिळतील. कोरोना वॉरियर्स सोबतचे हे विशेष भागात तुम्ही या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचा अनुभव जाणून घेऊ शकता.