मुंबई : स्किन पिलिंग म्हणजे हाताची त्वचा निघणे. हाताची त्वचा निघल्यामुळे त्रास होत नाही. परंतु कोणतेही काम करताना अनेक समस्या समोर येतात. या त्रासावर योग्य उपचार न केल्यास अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाताची स्किन निघाल्यास काही घरगुती उपाय नक्की करून पाहा.
कोमट पाणी
कोमट पाण्यात काही वेळ हात बुडवून ठेवा. त्यामुळे हाताची त्वचा नरम पडेल. त्यानंतर ते स्वच्छ पुसून त्यावर मॉईश्चराइजर लावा. मॉईश्चराइजरने त्वचा हायट्रेड राहील.
ऑलिव्ह ऑईल
हाताच्या साली निघत असतील तर त्यावर ऑलिव्ह ऑईल अत्यंत फायदेशीर ठरेल. ऑलिव्ह ऑईल चांगले मॉईश्चराइजर असून ते नियमित लावल्यास ही समस्या हळूहळू दूर होईल.
भरपूर पाणी प्या
ही समस्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीर हायट्रेड राहील. परिणामी शरीराचे डिटॉक्सिकेशन देखील होईल.
दूध आणि काकडीचा वापर
हाताची साल निघत असल्यास त्यावर दूध आणि काकडीचा तुकड्याने मसाज करा. काकडीत पाण्याचा अंश अधिक असल्याने त्वचा मॉईश्चराइज होते. दुधातील स्निग्धता त्वचेला आर्द्रता देते.