हॉट मल्लिका शेरावत पुन्हा करणार दमदार कमबॅक

अभिनेते दिग्दर्शक रजत कपूर आपल्या दिग्दर्शनात बनलेला सिनेमा 'आरके'च्या रिलीजसाठी सज्ज आहेत. 

Updated: Jun 29, 2022, 05:17 PM IST
हॉट मल्लिका शेरावत पुन्हा करणार दमदार कमबॅक title=

मुंबई : अभिनेते दिग्दर्शक रजत कपूर आपल्या दिग्दर्शनात बनलेला सिनेमा 'आरके'च्या रिलीजसाठी सज्ज आहेत. मंगळवारी या चित्रपटाचं टीझर लॉन्च केलं गेलं. टीझरनुसार, यात रजत कपूर एका चित्रपट निर्मात्याची भूमिका निभावत आहेत. हा निर्माता आपल्या कुठेतरी हरवलेल्या नायकामुळे चिंतेत आहे. या चित्रपटाच्या कथेत कुणीच मुख्य हीरो नाही.

याबाबत अभिनेता रणवीर शौरीने स्वदेशी सोशल मीडिया मंच 'कू' वर टीजर शेअर करत लिहिलं, "दोस्तों! हीरो ग़ायब है" 

या चित्रपटाच्या माध्यमातून सेन्सेशनल बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. मल्लिका याआधी दिसली होती, ती बिग बॉस 13 च्या सेटवर सलमान खानसोबत एकदम मोकळेपणाने मस्ती करताना. एवढंच नाही, तर जेव्हा ती बिग बॉसच्या घरात गेली होती, तेव्हा तिने तिथला स्पर्धक आसिमसोबत एकदमच हटकेवाला डान्सही केला होता.

याआधी मल्लिका शेरावत ही रणवीर शौरीसोबत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसलीये, जसं की, 'अगली और पगली' , 'प्यार के साइड इफेक्ट्स'. याचबरोबर मल्लिकाने 'मर्डर', 'ख्वाहिश', 'वेलकम', 'हिस्स' अशा सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुनूक दाखवत चाहत्यांचे मन जिंकली आहेत. हा चित्रपट 22 जुलै 2022 ला प्रदर्शित होणार आहे.