हेमा मालिनी यांनी शाहरुख खानला सिनेमासाठी केलं रिजेक्ट; कारण ऐकून बसेल धक्का

सिनेमात काम करायचं अनेकांच स्वप्न असतं, हजारो लोकं अॅक्टर बनायचं स्वप्न घेवून मुंबईत येतात.

Updated: Jun 30, 2022, 02:04 PM IST
हेमा मालिनी यांनी शाहरुख खानला सिनेमासाठी केलं रिजेक्ट; कारण ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : सिनेमात काम करायचं अनेकांच स्वप्न असतं, हजारो लोकं अॅक्टर बनायचं स्वप्न घेवून मुंबईत येतात. काहींची स्वप्न लगेच पूर्ण होतात. मात्र काहिंची ती स्वप्नच राहून जातात, ते म्हणतात ना Every master is a once a beginner, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचं त्याच्या स्ट्रगलिंग पिरियेडचे काही किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शाहरूख रिजेक्टेड!
मुंबईत आलेला कोणताही स्ट्रगलर आज कितीही सुपरस्टार झाला तरी त्याच्या करियरचे सुरवातीचे, स्ट्रगलींग पिरियेड कधीच विसरत नाही,  शाहारूखच्या सिनेमातल्या कारकिर्देला 30 वर्ष पुर्ण झाली या निमित्ताने त्यानं चाहत्यांशी बऱ्याच वेळ चर्चा केली. त्या चर्चेत शाहरूखने त्याच्या पहिल्या सिनेमासाठीच्या ऑडिशनचा एक किस्सा सांगितलाय.

इंडस्ट्रीतील आपल्या 30 वर्षांच्या आठवणीत शाहरुखने पहिल्या 'दिल आशना है' या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. टीव्हीवरच्या फौजी या मालिकेत पाहिल्यानंतर दिल आशना है या सिनेमाच्या प्रोड्युसर हेमा मालिनी यांनी शाहरूखला फोन केला, आणि ऑडिशनला बोलवून घेतलं, पण जेव्हा शाहरुखने ऑडिशन दिलं तेव्हा हेमा यांना ते आवडलं नाही. तिने शाहरुखला नंतर दुसरं ऑडिशन घेईन असं सांगत त्याला घरी पाठवलं.

धर्मेंद्र यांच्याकडून शाहरूखचं सिलेक्शन
त्यानंतर हेमा यांनी पती धर्मेंद्रने शाहरुख खानला भेटायला सांगितलं. खरं तर या भेटीनेच शाहरुखसाठी चित्रपटसृष्टीची दारं खुली झाली. पहिल्या भेटीतच धर्मेंद्र यांना शाहरुख आवडला आणि त्यांनी हेमाला या मुलाला चित्रपटात घ्यायला सांगितलं. शाहरुखला पहिल्यांदा 'दिल आशना है' मध्ये पाहिल्यावर हेमा म्हणाल्या होत्या की, शाहरुख एक दिवस सुपरस्टार होईल. ऑडिशन देताना शाहरुखचं नाक खूप आवडलं असंही हेमा गमतीनं म्हणायच्या. 

शाहरुख जेव्हा जेव्हा त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलतो तेव्हा त्याला पहिली संधी दिल्याबद्दल हेमा मालिनी यांना मोठ्या आदराने आठवतात. असंही त्याने चाहत्यांशी बोलताना सांगितलं. हेमाजींनी मला माझा पहिला चित्रपट करण्याची संधी दिली हे माझे भाग्य आहे. त्याच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये शाहरुखने सांगितलं की, आजही त्याला शूटिंगचा पहिला दिवस आठवतो, जेव्हा त्याने संध्याकाळी 5 किंवा 6 च्या सुमारास हेमा मालिनीने चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं आणि तो मुंबईतील लोखंडवाला जवळ कुठेतरी होता. एका बंगल्यात सेट बांधलेला होता. त्यांनी मला संधी दिली त्यामुळेच आज मी सुपरस्टार झालो असं शाहरुखने चाहत्यांशी बोलताना सांगितलं.