सासू-सासऱ्यांसोबत कसं होतं जया बच्चन यांचं नातं? वादानंतर अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट

Jaya Bachchan : जया बच्चन त्यांच्या सासू-सासऱ्यांना कशी वागणूक द्यायच्या...  अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट

दिक्षा पाटील | Updated: Sep 5, 2024, 07:25 PM IST
सासू-सासऱ्यांसोबत कसं होतं जया बच्चन यांचं नातं? वादानंतर अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट title=
(Photo Credit : Social Media)

Jaya Bachchan : गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात होणारे मतभेद आणि त्याचीच सगळीकडे चर्चा सुरु होती. त्यामुळे ते दोघं विभक्त होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. या सगळ्या अफवा असल्या तरी देखील बच्चन कुटुंबानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती किंवा ऐश्वर्या आणि अभिषेकनंही नाही. त्यांच्यात वाद असण्याचं कारण ऐश्वर्याचं सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चनसोबत असलेले मतभेद होते असे म्हटलं जातं होतं. त्यानंतर अभिषेकनं समोर येऊन या सगळ्या अफवाहं असल्याचं सांगितलं. खरं सांगायचं झालं तर बच्चन कुटुंबाविषयी अशा चर्चा पहिल्यांदा झालेल्या नाही तर या आधी देखील अमिताभ आणि जया बच्चन यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इतकंच नाही तर अमिताभ यांचे जवळचे मित्र अमर सिंह यांनी दावा केला होता की जया बच्चन त्यांच्या सासू-सासऱ्यांना चांगली वागणूक देत नव्हत्या. त्यावेळी त्यांनी बच्चन कुटुंबातील नात्यांवर अनेक खुलासे केले. 

जया बच्चननं 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केलं. जया यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांचे वडील त्यांच्या लग्नामुळे आनंदी नव्हते. त्यांना अमिताभ यांच्यासोबत लेक जयाचं नातं आवडत नव्हतं. जयाचे सासरे हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या In the Afternoon of Time मध्ये सांगितलं होतं की अमिताभ यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर जया यांच्या वडिलांनी त्यांना काय सांगितलं होतं. 

हरिवंश राय यांनी त्यात लिहिलं की आम्ही जाण्याआधी आमच्या नुकत्याच झालेल्या सुनेच्या वडिलांना मिठी मारली आणि अमितसारखा जावई मिळाला याच्या शुभेच्छा दिल्या. मला आशा होती की ते जयाविषयी देखील असंच बोलतील. पण त्यांनी म्हटलं की माझं संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. हे ऐकल्यानंतर हरिवंशराय यांना आश्चर्य झाले. 

जवळपास 8 वर्षांपूर्वी 'दैनिक भास्कर' ला दिलेल्या मुलाखतीत अमर सिंह यांनी जया बच्चन यांचे सासू-सासरच्यांसोबतच्या नात्याविषयी खुलासे केले होते. अमर सिंह 20 वर्षांपर्यंत अमिताभ बच्चन यांचे खास-जवळचे मित्र होते आणि त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे ते बच्चन कुटुंबाला खूप जवळून ओळखत होते. अमर सिंह यांनी सांगितलं होतं की जया बच्चन यांनी जवळपास 15 वर्षांपर्यंत त्यांच्या सासू-सासऱ्यांना खूप वाईट वागणूक दिली.  

अमर सिंह यांनी सांगितलं की जया नवरा अमिताभ बच्चन यांच्यासमोर त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांचा अपमान करायची. अमिताभ काही बोलू शकत नव्हते. त्यामुळेच अमिताभ आणि जया हे वेगळे राहू लागले होते. जेव्हा या दाव्याविषयी विचारण्यात आले, तेव्हा अमर सिंह म्हणाले होते की असं त्यांनी कधी सांगितलं नाही. ते जेव्हा अमिताभ यांना भेटले होते तेव्हा ते 'प्रतिक्षा' बंगल्यात राहत होते आणि जया 'जलसा' या बंगल्यात राहत होत्या. जया यांचं हरिवंश राय आणि तेजी बच्चन यांच्यासोबत चांगले संबंध नव्हते. 

अमर सिंग यांनी सांगितलं की अमिताभ यांना हे सहन होत नव्हतं आणि ते सगळं त्यांच्या दिल्लीच्या गुलमोहर मार्गवर असलेल्या 'सोपान' या घरी बाहेर पडलं. जेव्हा अमिताभ यांचे आई-वडील हे आजारी पडले तेव्हा ते त्यांना घेऊन 'प्रतिक्षा' मध्ये गेले. तेव्हा देखील जया यांनी सासू-सासऱ्यांना चांगली वागणूक दिली नाही. अमर सिंह यांनी पुढे सांगितलं की जया यांचं वागणं पाहून त्यांनी त्यांना दुसरा बंगला 'जलसा' दिला आणि ते आई-वडिलांसोबत 'प्रतिक्षा' बंगल्यात राहू लागले होते.

हेही वाचा : बिग बींपेक्षाही श्रीमंत आहे त्यांची नात नव्या! वारसा हक्कानं मिळालीये 'इतकी' संपत्ती

अमर सिंहनं सांगितलं होतं की त्यावेळी अमिताभ आणि जया वेगळ्या घरात राहू लागले आणि नंतर अभिषेक आणि ऐश्वर्या देखील वेगळ्या घरात राहू लागले. अमर सिंहनं आरोप लावला की त्यामुळे अमिताभ आणि जया यांचं भांडण देखील होतं होतं आणि त्यामुळे ते वेगळे झाले. त्यावर अमर सिंह म्हणाले, त्यांनी कोणाला वेगळं केलं नाही आणि त्यांच्या-त्यांच्याच कारणामुळे ते वेगळे झाले. काही वर्षांनंतर अमर सिंह यांनी अमिताभ यांच्याशी माफी मागितली आणि म्हटलं की त्यांनी थोडं जास्त ओव्हररिअॅक्ट केलं. पण त्यांनी हे सांगितलं की जेव्हा ती 20 वर्षांआधी अमिताभ आणि जया यांना भेटले तेव्हा देखील ते वेगवेगळे राहत होते. आता अमर सिंह हे या जगात नाही. 2020 मध्ये वयाच्या 64 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.