मुंबईत 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्काचं घर मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचा मेगा प्लान

Eknath Shinde on Mumbai Housing Project: मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या निर्णयामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीला मोठा फयदा होण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 12, 2024, 02:36 PM IST
मुंबईत 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्काचं घर मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचा मेगा प्लान title=

Eknath Shinde on Mumbai Housing Project: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईत रखडलेले120 पुर्नविकास प्रकल्प (Redevelopment Project) मार्गी लावण्याचा मेगा प्लान शिंदेंनी आखला आहे. त्यानुसार 2 लाखाहून अधिक कुटुंबियांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे. या 120 प्रकल्पातील 60 प्रकल्प हे पालिकेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे रखडलेले प्रकल्प सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, एमआयडीसी, महाप्रित आणि पालिकेतर्फे यामार्फत मार्गी लावण्याचा मानस आहे.

इमारतीच्या बांधकामाचा खर्च हा सेलेबल इमारतीतल्या खोल्या विकून झालेल्या पैशातून वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे. घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरचा (Ramabai Ambedkar Nagar) पुनर्विकास प्रकल्पाप्रमाणे या रखडलेल्या पुर्नविकासाला चालना दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर घेण्यात येणाऱ्या या निर्णयामुळे मुंबईत महायुतीला याचा मोठा फायद होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

दरम्यान, कोस्टल रोड आणि वांद्रे सी-लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या मार्गाचं उदघाटन होणार आहे.. त्यामुळे मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होईल. कोस्टल रोडचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झालाय. आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी परदेशी पाहुण्यांना निमंत्रण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये श्री गणेशाची आरती संपन्न झाली. यानंतर या परदेशी पाहुण्यांसाठी खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. विविध देशांच्या या राजदूतांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद घेतला. तसेच मोठ्या उत्साहात आणि आनंदात आरतीही केली. श्री गणेशाचा आवडता नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकांचा देखील आस्वाद घेतला.

यात श्रीलंका, मॉरिशस, स्वीडन,स्वित्झर्लंड,यूएई,अमेरिका,येमेन,कोरिया,चिली, चायना,मेक्सिको,जर्मनी, इंडोनेशिया,इराक,इराण,आयर्लंड,इटली,अर्जेंटिना,ऑस्ट्रेलिया, बांगलादेश,बहारिन, बेलारूस या देशांच्या भारतीय राजदूतांचा समावेश होता.