लग्नानंतर विकी कौशल कतरिनासोबत व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार?

विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जातात मात्र यावेळी...

Updated: Feb 12, 2022, 03:54 PM IST
लग्नानंतर विकी कौशल कतरिनासोबत व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार? title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच दोघंही आप-आपल्या कामात सतत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत हे  कपल कधी विकीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तर कधी कतरिनाच्या शूटमध्ये व्यस्त आहे.

खरंतर मिसेस कौशल लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन तिचा पती विकी कौशलसोबत नाही तर एक्स बॉयफ्रेंड आणि  अभिनेता सलमान खानसोबत साजरा करणार आहे. मात्र  हे आगामी चित्रपट टायगर 3 च्या शूटमुळे आहे. अशा परिस्थितीत हे विकी-कतरिना हा खास दिवस कसा साजरा करणार हे जाणून घेऊया.

रिपोर्टनुसार, सलमान खान आणि कतरिना कैफचा चित्रपट टायगर 3 ची शूटिंग 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचं शूटिंग दिल्लीत होणार आहे. सलमान आणि कतरिना 14 फेब्रुवारीलाही शूटिंग करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक मनीश शर्मा दिल्लीतील लोकेशन्सवर शूट करणार आहेत. 12 फेब्रुवारीला सलमान आणि कतरिना दिल्लीला रवाना होणार आहेत. आता चित्रपटाचं शूटिंग रिअल लोकेशनवर होणार असल्याने निर्माते सुरक्षेची पूर्ण काळजी घेणार आहेत.

सलमान आणि कतरिना 10-12 दिवस दिल्लीत शूटिंग करणार आहेत. मात्र, दोघंही दिल्लीत कुठे शूट करणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अशा परिस्थितीत आता विकी आपल्या पत्नीसाठी कामातून वेळ काढून दिल्लीला जाणार आहे आणि तिथे आपल्या लेडी लव्हचा दिवस अधिक खास बनवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. विकी कौशल 'सॅम बहादूर' चित्रपटात भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉच्या भूमिकेत दिसणार आहे.