हृतिक-कंगना वादात राकेश रोशन यांची उडी...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशन यांमध्ये रंगलेले युद्ध सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 4, 2017, 03:35 PM IST
हृतिक-कंगना वादात राकेश रोशन यांची उडी... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशन यांमध्ये रंगलेले युद्ध सध्या सर्वत्र चर्चिले जात आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने एका टीव्ही शो मध्ये तिच्या आणि हृतिकच्या नात्याबद्दल स्पष्ट व्यक्तव केले होते. तसेच तिने अगदी बेधकपणे त्याच्यावर आरोप केले. त्यानंतर हृतिक-कंगना वादाला अधिकच तोंड फुटले. मात्र अलीकडेच या वादात हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी उडी घेतली आहे आणि याबद्दल आपले मत मांडले आहे. 

बॉलिवूड डॉट कॉम च्या वृत्तानुसार राकेश रोशनने सांगितले, "आम्ही हवेत गोष्टी करत नाही. तसंच आम्ही फालतू आरोपांकडे लक्ष देखील देत नाही. आम्ही  आमच्या तक्रारींसाठी पुरावे जमा केले आहेत. पुरावे हवे असतील तर तुम्ही महेश जेठमलानी यांच्या ऑफीसमध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर राकेश रोशन यांनी सांगितले की, तुम्ही तक्रारी वाचाल तर हैराण व्हाल. आम्ही आमची सत्य बाजू ८ एप्रिल २०१७ मध्ये क्राईम ब्रांचला सांगितली आहे. सगळे पुरावे देखील जमा केले आहेत. आता सत्य बाजू कोणाची आहे हे तपासणे आणि निर्णय देणे सरकारी संस्थांचे काम आहे."