हृतिक रोशनचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का

हृतिक रोशनने त्याचा लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Updated: Jun 17, 2022, 09:22 PM IST
हृतिक रोशनचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का title=

मुंबई : हृतिक रोशनने त्याचा लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फोटोमध्ये तो क्लीन शेव्हमध्ये दिसत आहे. हृतिकचा हा फोटो पाहून  चाहत्यांना 'कहो ना प्यार है' या सिनेमाची आठवण येत आहे.  या चित्रपटात त्याच्या विरुद्ध अमिषा पटेल दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि या चित्रपटामुळे हृतिक रोशन रातोरात स्टार बनला. या सिनेमानंतर त्याच्या फिमेल फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाली.  

नुकताच एक फोटो शेअर करत हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिलं, "उफ़" त्याची मैत्रिण प्रीती झिंटाने या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केलाय. हृतिकची चुलत बहीण पश्मिना रोशनने लिहिलं, "हा कोण आहे?" झोया अख्तरने लिहिलं, "होला." एका चाहत्याने लिहिलं आहे की, हृतिक त्याच्या पहिल्या 'कहो ना प्यार है' चित्रपटात रोहितसारखा दिसत आहे. तर अजून एका चाहत्याने लिहिलं, “अरे देवा! हा KNPH चा रोहित आहे." तर अजून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं, 'हा 20 वर्षांचा मुलगा कोण आहे?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हृतिक शेवट 2019 मध्ये वॉर चित्रपटात दिसला होता. ज्यामध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर, काही दिवसांपूर्वी हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलं होतं की, त्याने त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हृतिकशिवाय सैफ अली खान देखील आहे. विक्रम वेधा या वर्षी 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.