'घाणेरडं बाथरुम आणि जेवणाच्या नावावर...';जेलमध्ये काढलेल्या दिवसांत रियाला आला धक्कादायक अनुभव

Rhea Chakraborty Horrifying Experience in Jail : रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 15, 2024, 12:05 PM IST
'घाणेरडं बाथरुम आणि जेवणाच्या नावावर...';जेलमध्ये काढलेल्या दिवसांत रियाला आला धक्कादायक अनुभव title=
(Photo Credit : Social Media)

Rhea Chakraborty Horrifying Experience in Jail : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती 4 वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुत प्रकरणात अडकली होती. त्याच्या निधनानंतर तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यात तिच्यासाठी असलेली सगळ्यात भयानक अशी गोष्ट होती ती म्हणजे तुरुंगवास. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीनं तिच्या तुरुंगातील दिवसांविषयी सांगितलं आहे. त्यावेळी तिनं सांगितलं की तिचे दिवस कसे गेले. पहिल्या दिवशी तिला खायला काय मिळालं आणि तिथे टॉयलेटची सुविधा कशी होती. 

रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमधअये होती. खरंतर त्या दोघांपैकी कोणीच त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नव्हता. तर 2020 मध्ये जेव्हा सुशांतनं वांद्रेच्या राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण देशात एकच चर्चा रंगली होती. सुशांतच्या निधनात ड्रग्सचा अॅंगल घालण्यात आला होता. त्याचा तपासात असलेली एनसीबी आणि ईडीच्या रडारवर रिया चक्रवर्ती होती. सुशांतच्या कुटुंबानं रियावर गंभीर आरोप केले होते. इतकंच नाही तर तिला या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी देखील समजले जात होते. त्यावरुन रिया एक महिना भायखळाच्या रुग्णालयात होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिया च्रकवर्तीनं आता चेतन भगतच्या शोमध्ये तिचा तुरुंगातील अनुभव सांगितला आहे. त्या शोचं नाव आहे 'डीपटॉक विद चेतन भगत'. यावेळी बोलताना रिया चक्रवर्ती म्हणाली की 'कोरोना काळात असलेल्या प्रोटोकॉलमुळे मला 14 दिवस तुरुंगाती एक वेगळ्या रुममध्ये ठेवण्यात आले होते. त्या रुममध्ये मी एकटी होते. त्यावेळी मला दुपारी विचारण्यात आलं होतं की मी जेवण करणार की नाही. मी इतकी उपाशी आणि दमलेली होती की मला जे पण दिलं ते मी खाल्लं.'

तिला यावेळी विचारण्यात आलं की 'मेन्यूमध्ये काय होतं?' उत्तर देत रिया म्हणाली की 'चपाती आणि शिमला मिर्चची भाजी. शिमरा मिर्च पाण्यात तरंगत होती. खरंतर तेव्हा या गोष्टीचा फरक पडला नाही. तुरुंगात एक कॅन्टिन आहे, जिथून तुम्ही बिस्किट खरेदी करू शकतात. कधी-कधी चने देखील मिळतात. घरुन तुम्हाला 5 हजार रुपयांचं मनी ऑर्डर मिळतं आणि तुम्हाला त्याच्यातच संपूर्ण महिना काढावा लागतो. ते पैसे देऊन तुम्ही पाणी सुद्धा विकत घेऊ शकतात, ते पाणी तुरुंगात येत असलेल्या नळाच्या पाण्यापेक्षा चांगलं असतं. 2500 रुपये तर त्यातच जातात.'

पुढे रियाला विचारण्यात आलं की 'तुरुंगात टॉलेटची परिस्थिती कशी होती?' तर रिया म्हणाली, 'जिथे तुम्ही झोपतात. त्याच्या बाजुलाच होतं. हे काही बेस्ट टॉयलेट नसतात. त्यांची परिस्थिती खूप वाईट असते. तुरुंगात राहणं सगळ्या कठीण असतं. मेंटल ट्रॉमा खूप भयानक असतो की फिजिकल ट्रॉम देखील त्याच्यासमोर कमी पडतो. तेव्हा तुम्हाला वाटतं की घाणेरडं बाथरुम तर मी कसं तरी मॅनेज करेल.'

रियानं पुढं तिच्या तुरुंगातील दिवसांविषयी सांगत तिथलं डेली रुटिन सांगत म्हणाली तुरुंगात सकाळी 6 वाजता नाश्ता, सकाळी 11 वाजता दुपारचं जेवण आणि दुपारी 2 वाजता रात्रीचं जेवणं देण्यात येत होतं. रियानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 5 वाजता कैद्यांसाठी बराकचे दरवाचे उघडायचे आणि संध्याकाळी 5 वाजता बराकचे दरवाजे बंद करायचे. रिया म्हणाली तिथे असलेले अनेक लोक हे दुपारी 2 वाजता देण्यात येण्याचं जेवणं संध्याकाळसाठी ठेवायचे आणि संध्याकाळी 7-८ वाजता करायचे. मात्र, मी माझं संपूर्ण दिनचर्या बदलली होती. ते जेवण तसही खाल्ले जात नव्हतं. गरम असेल तर खाल्लं तरी जाईल. थंड असेल तर मुळीच खाल्ल जाणार नाही. त्यामुळे मी सकाळी 4 वाजता उठायचे आणि दुपारी 2 वाजता रात्रीचं जेवण करायचे.'

हेही वाचा : 'त्याचा कचरा करू नकोस'; अगस्त्य नंदाला लष्करी अधिकाऱ्याचा कडक इशारा

रिया चक्रवर्तीनं सांगितलं की जेव्हा तिला तुरुंगातून सुटका मिळाली, तेव्हा तिनं तुरुंगातील महिलांसाठी 'नागिन गिन गिन' गाण्यावर डान्स केला. रियानं सांगितल की महिला कैद्यांनी तिच्याकडे मागणी केली होती की तू अभिनेत्री आहेस नाही मग आम्हाला डान्स करून दाखव. तेव्हा रियानं जमिनीवर झोपून त्यांच्यासाठी नागिन डान्स केला होता. पण रियाला खूप वाईट वाटतं होतं कारण तिचा भाऊ शौविकला सुटका मिळाली नव्हती.