हृतिक रोशनच्या Ex Wife चे बॉयफ्रेंडसोबतचे ते फोटो व्हायरल

त्यात आता सुझैनचा एक फोटो चर्चेत आहे

Updated: Dec 19, 2021, 05:51 PM IST
  हृतिक रोशनच्या Ex Wife चे बॉयफ्रेंडसोबतचे ते फोटो व्हायरल  title=

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाइफ सुझैन खान तिच्या खाजगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली चर्चेत आहे. घटस्फोटानंतर ही सुझैन बऱ्याचदा हृतिक रोशनसोबत वेळ घालवताना दिसते. काही पार्ट्यांना देखील ते एकत्र दिसून येतात. 

त्यात आता सुझैनचा एक फोटो चर्चेत आहे. ज्यात ती बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. सुझैन खान सध्या टीव्ही अभिनेता अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीला डेट करत आहे, अशी चर्चा आहे. अनेकवेळा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघंही अनेक कार्यक्रमात एकत्र असतात. दोघंही नुकतेच गोव्याला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी देखील गेले होते. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा होत आहे. अर्सलाननं 19 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा केला. ज्यामध्ये सुजैन खानची उपस्थिती खूप खास होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्सलान गोनीच्या बर्थडे पार्टीत सुजैन खानही उपस्थित होती. याशिवाय अनुष्का रंजन आणि तिचे काही जवळचे मित्रही या पार्टीचा सहभागी झाले होते. अनुष्का रंजननेही या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये सुजैन खान अर्सलानसोबत दिसत आहे.

सुझैनने अर्सलान गोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.