ऋता दुगुळे ठरली 'झी टॉकीज'ची पॉप्युलर फेस ऑफ दि इअर!

छोटा पडदा, मोठा पडदा, रंगभूमी, सोशल मीडिया अशा प्रत्येक स्क्रिनवर हृताने सिक्सर मारला आहे. त्यात आता  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आहे.

Updated: Feb 26, 2023, 07:59 PM IST
ऋता दुगुळे ठरली 'झी टॉकीज'ची पॉप्युलर फेस ऑफ दि इअर! title=

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात  मानाचा समजला जाणारा "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? "हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे.  छोट्या पडद्यावरील समंजस जबाबदार नायिका म्हणून अभिनेत्री ऋता दुर्गुळेने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतच.  रंगभूमीवरही नटखट अंदाजातील पहिली भूमिका साकारत हृताने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आता हृताला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी पॉप्युलर फेस ऑफ दि इअर हा किताब मिळाला आहे. 

छोटा पडदा, मोठा पडदा, रंगभूमी, सोशल मीडिया अशा प्रत्येक स्क्रिनवर हृताने सिक्सर मारला आहे. त्यात आता  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आणि तिच्या  आनंदालाही नवी पालवी फुटली.  झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्काराच्या रूपाने  प्रेक्षकांची पसंती कायम स्पेशल राहील असं म्हणत ऋताने हा आनंद साजरा केला.

गेल्या वर्षभर प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून विविध बारा विभागासाठी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ दि इअर, फेव्हरेट अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, सहाय्यक अभिनेता , सहाय्यक अभिनेत्री, फेव्हरेट सिनेमा, गायक, गायिका, गाणं, संगीतकार, दिग्दर्शक आणि स्टाईल आयकॉन अशा विभागांचा समावेश आहे. 

झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या कलाकारांमधून प्रेक्षकच त्यांच्या पसंतीची मोहर उमटवत असतात. त्यामुळे कलाकारांनाही हा सन्मान म्हणजे प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीच असते.

रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . प्रेक्षकांच्या पसंतीतूनच महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? या पुरस्कारावर नाव कोरलेल्या कलाकारांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे.
 
छोट्या पडद्यावर मोठी प्रसिद्धी  मिळवणारी अभिनेत्री ऋता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली. सोशल मीडियावर नेहमीच हिट असलेल्या ऋताची टीव्ही मालिकेतील प्रतिमा अतिशय सोज्वळ, समजूतदार नायिका अशी आहे. ऋताने टाइमपास ३ या पहिल्याच सिनेमात साकारलेल्या टपोरी गर्ल पालवीने अक्षरशा धमाल केली.  

ती आली आणि तिने जिंकलं असच काहीस ऋता च्या बाबतीत झालं आहे. दुर्वा या मालिकेतून तिने अभिनयाला सुरूवात केली. फुलपाखरू . मन उडू उडू झालं या तिच्या मालिकाही गाजल्या. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातूनही ती प्रेक्षकांना आवडली. अनन्या आणि टाइमपास ३ या सिनेमाने ऋताला घराघरात पोहोचवलं. इन्स्टाग्रामवर ऋताचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर २५ लाख फॉलोअर्स आहेत.