'टाइमपास ३' मध्ये 'या' अभिनेत्रीची वर्णी

कोण आहे ही अभिनेत्री?  

Updated: Jan 22, 2021, 11:41 AM IST
'टाइमपास ३' मध्ये 'या' अभिनेत्रीची वर्णी

मुंबई : 'टाइम पास', आणि 'टाइम पास 2' या दोन चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात घरं केलं. 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'टाइम पास' चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंन केले. चित्रपटाच्या पहिल्या भागात प्राजू आणि दगडूच्या प्रेमाचा गुलाब फुलला आणि प्रेक्षकांनाही तो फार आवडला. पहील्या भागात त्यांच भंग झालेले प्रेम  दुसऱ्या भागात मात्र जुळून आलं. दगडूने प्राजूला भेटण्यासाठी जो मार्ग आवलंबला त्यानं तर प्रेक्षकांच्या मनात घरचं केलं.

तर 'टाइम पास'च्या दुसऱ्या भागानंतर आता दिग्दर्शक निर्माते रवी जाधव पुन्हा एकदा 'टाइमपास'च्या तिसऱ्या भागाची तयारी करत असल्याचं समजतं. त्यामुळे चाहत्यांना प्राजू आणि दगडू एका नव्या रूपात भेटणार आहेत. 'टाइमपास'च्या तिसऱ्या भागात नव्या अभिनेत्रीचा एन्ट्री होणार आहे. 

तिसऱ्या भागात अभिनेत्री ऋता दुर्गुळे झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबद्दल अद्याप कोणीही अधीकृत घोषणा केली नाही. मात्र दुर्गाने चित्रपटात काम करण्यास होकार दिल्याचं कळत आहे. 

यावेळी देखील संवाद लेखनाची जबाबदारी अभिनेता-लेखक प्रियदर्शन जाधव याच्यावरच असल्याचं कळतंय. रवी जाधव या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय. पहिल्या भागात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगांवकर साकारली असून दगडूची भूमिका प्रथमेश परब याने साकारली होती.