'हम दिल दे चुके सनम' ला 22 वर्ष पूर्ण, सलमान-ऐश्वर्याने शेअर केले खास फोटो

 सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगनचा हा चित्रपट 18 जून 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. 

Updated: Jun 19, 2021, 08:32 PM IST
'हम दिल दे चुके सनम' ला 22 वर्ष पूर्ण, सलमान-ऐश्वर्याने शेअर केले खास फोटो

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' (HUM DIL DE CHUKE SANAM) या चित्रपटाला आज 22 वर्षे पूर्ण झालीये. सलमान खान, ( Salman Khan ) ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अजय देवगनचा (Ajay Devgan) हा चित्रपट 18 जून 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. त्या वर्षीचा हा सर्वात हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट होता. या खास प्रसंगी ऐश्वर्या रायने चित्रपटाच्या सेटवरचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती संजय लीला भन्साळीसोबत दिसत आहे. ऐश्वर्याने या चित्रपटाविषयी एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात तिने संजय लीला भन्साळी आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

"हम दिल दे चुके सनम"ची 22 वर्ष, मला आठवतंय खूप सारं प्रेम, ... पण माझा प्रिय संजय ... तो सदाबहार आहे... कायमचा ... धन्यवाद ... आणि जगभरातील आमच्या सर्वांना दर्शकांना ... आणि कायमच प्रेम करणारं कुटुंब - हितचिंतक ... सर्वाचे प्रेमाबद्दल धन्यवाद ... नेहमीच खूप सारं प्रेम.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

'हम दिल दे चुके सनम' रिलीज झाल्यानंतर 22 वर्षानंतर सलमान खानने देखील लोकांनी कधीही न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो संजय लीला भन्साळीसोबत बसलेला दिसत आहे. पोस्ट शेअर करत सलमानने लिहिले- हम दिल दे चुके सनमला 22 वर्ष झाले आहेत. सलमान खानने संजय लीला भन्साळी आणि अजय देवगन यांनाही टॅग केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 या खास प्रसंगी अजय देवगणने संजय लीला भन्साळीसोबत चित्रपटाच्या सेटवरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. चित्रपटाचे काही शॉट्सही शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)