'या' अभिनेत्रीने बेड सीन वडिलांना विचारून केले, काय म्हणाले वडील

आपली पहिलीच मालिका 24 मधून लोकप्रिय झालेली सपना पब्बी. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 29, 2018, 08:51 PM IST
'या' अभिनेत्रीने बेड सीन वडिलांना विचारून केले, काय म्हणाले वडील  title=

मुंबई : आपली पहिलीच मालिका 24 मधून लोकप्रिय झालेली सपना पब्बी. 

आता आपलं फिल्मी करिअर खामोशियां या सिनेमातून सुरू करत आहे. सिनेमातील आपले बोल्ड आणि बेडसीनमुळे सपना चर्चेत आली. आता पुन्हा एकदा तिच्यावर सगळ्यांच्या  नजरा खिळल्या आहेत. त्याला कारण आहे ब्रीद ही वेब सिरीज. तुम्हाला जाणून धक्का बसेल पण खामोशियातील बेड सीन तिने चक्क आपल्या वडिलांना विचारून केले आहेत.

सपनाने शेअर केला हा अनुभव

मला आठवतंय की, माझी रूममेट माझ्यासोबत बसली होती. तिने मला विचारलं की, मला ऐकायचंय की बेड सीनच्यावेळी तुझ्या वडिलांचं मत काय होतं, हा अनुभव सपनाने शेअर केला आहे. सपनाने म्हटले की, ‘मी त्यांना फोन करून सांगितले की, मला एका चित्रपटाचा प्रस्ताव आला आहे. ज्यामध्ये बरेचसे बेडरूम सीक्वेंस आहेत. माझे हे शब्द ऐकून ते शांत झाले. तेव्हा मी त्यांना म्हटले की, पापा अशाप्रकारचे सीन करिना कपूरने ‘कुर्बान’मध्ये केले आहेत. प्रियंका चोपडानेही ‘एतराज’मध्ये असे सीन केले. त्यांनतर त्यांनी फोनवर मला चित्रपटात काम करण्यास नकार दिला नाही, मात्र त्याचबरोबर या मुद्द्यावर पुन्हा कधी चर्चाही केली नाही. 

त्यानंतर जेव्हा मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केला तेव्हा मॉडलिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी माझे वडील माझ्याजवळ नसल्याने मला मॉडलिंग करता आली. मी पॉकेटमनीसाठी मॅकडॉनल्ड्समध्येही काम केले. पुढे ग्रॅज्युएट केल्यानंतर मी एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करायला सुरुवात केली. मी माझा जॉब आणि आयुष्यात आनंदी होती. त्याचबरोबर मला एका टीव्ही शोची आॅफर आली. याबाबत मी माझ्या आईशी चर्चा केली तेव्हा तिने म्हटले, ‘तू वेडी झाली आहेस काय? अगोदर तुझ्या वडिलांना तर विचार? हे शब्द ऐकताच मी फ्लॅशबॅकमध्ये गेली. कारण दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी त्यांना हे विचारले होते, तेव्हा ते चांगलेच भडकले होते. 

अशाही स्थितीत मी घाबरत-घाबरत त्यांना विचारण्याचे धाडस केले. मी त्यांना विचारले अन् त्यांनी परवानगी दिली. त्यांनी म्हटले की, ‘तू मोठी आणि समजूतदार झाली आहेस. त्यामुळे आता तू करिअरसाठी अभिनय हे क्षेत्र निवडू शकतेस. अशापद्धतीने माझी इंडस्ट्रीत सुरुवात झाल्याचे सपनाने सांगितले.