'23 वर्ष CID…' अभिनेत्री मधूरा वेलणकरने केलं सासऱ्यांचं कौतूक

सीआयडी मधील कुछ तो गडबड है दया. हा डायलॉग तुम्हाला आठवतच असेल. तर हा डायलॉग जितका प्रसिद्ध होता तितकाच सीआयडीमधील सगळेच कलाकारही खूप प्रसिद्ध होते.

Updated: Mar 11, 2024, 06:24 PM IST
'23 वर्ष CID…' अभिनेत्री मधूरा वेलणकरने केलं सासऱ्यांचं कौतूक title=

मुंबई : अभिनेत्री मधुरा वेलणकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मधुराने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये मधूराने आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलं आहे. मात्र मधुरा वेलणकर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. लवकरच अभिनेत्रीचा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जितकी अभिनेत्री तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते तितकीच तिचं प्रोफेशनल लाईफही चर्चेत असतं. मात्र अभिनेत्रीने तिच्या पर्सनल आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.   ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची मधूरा सून आहे.

सीआयडी मधील कुछ तो गडबड है दया. हा डायलॉग तुम्हाला आठवतच असेल. तर हा डायलॉग जितका प्रसिद्ध होता तितकाच सीआयडीमधील सगळेच कलाकारही खूप प्रसिद्ध होते. १९९८ साली सुरू झालेलं ‘सीआयडी’ (CID) कार्यक्रम तुफान गाजला होता. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्रही खूप हिट झालं. इतकंच नव्हेतर यातले अनेक डायलॉगही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मात्र शिवाजी साटम यांच पात्र खूपच गाजलं. प्रत्येक घरात हा कार्यक्रम पाहायला जायचा. शिवाजी साटम यांचां चाहतावर्ग खूप मोठा आहे. नुकतंच त्यांची सून मधूरा वेलणकर हिने देखील त्यांचं भरभरुन कौतूक केलं आहे. याचबरोबर मधूराने याच मालिकेतील सगळ्याच कलाकारांच खूप कौतूक केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मधूरा वेलणकर म्हणाली की,  ''खरं सांगायचं झालं तर मला अतिशय अभिमान आहे यागोष्टीचा की माझे सासरे २३ वर्ष 'सीआयडी' सारखी मालिका करत होते. सर्वाधिक चालेली ही मालिका होती. कधीही ती मालिका रटाळ झाली नाही. त्यांची ही एक प्रकारे नोकरीच होती. जसं २०, २३ वर्ष माणसं नोकरी करतात अगदी तसंच होतं.‘सीआयडी’ मालिकेतील सगळे कलाकार खूप गोड माणसं आहेत. त्यांनी इतके वर्ष काम केलं. पण त्यांच्या वागण्यात अजिबात कुठे गर्व नाहीये. माणूस म्हणून खूप गोड माणसं आहेत. माझे सासरे सगळ्यात मोठे आहेत. त्यांना अतिशय आदराने आणि प्रेमाने त्यांची काळजी घेतात. आजही ते कलाकार 'सीआयडी' संपल्यानंतरही त्यांच्या संपर्कात आहेत. ते एकत्र काम करतात, एखाद्या कार्यक्रमाला एकत्र जातात. त्यांचं जे नातं तयार झालंय, ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीये.''

सध्या मधूराचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. मधुराला आपण आजवर अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून पाहिलंय. मधुरा मनोरंजन विश्वात चांगलीच सक्रीय आहे. मात्र तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत.